दिल्लीतील अधिवेशनासाठी संतोष साखरे यांची निवड !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
        बिलोली तालुक्यातील पिंपळगाव येथील संतोष साखरे यांची दिल्ली येथे होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या प्रति अधिवेशनासाठी निवड झाली आहे.
दि. २५ ते २७ एप्रिल या कालावधीत दिल्ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये हे अधिवेशन होणार आहे. देशाच्या राजकारणातील अनेक महत्त्वाचे नेते आणि केंद्रीयमंत्री या अधिवेशनाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. संतोष साखरे हे केंद्रीय आरोग्य समितीवर काम करतात. त्यांना आरोग्यविषयक विविध महत्त्वांच्या विषयावर चर्चा करण्याची संधी या अधिवेशनाच्या माध्यमातून मिळणार आहे.
दहा वेगवेगळ्या केंद्रीय समितीचे पदाधिकारी, या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. संतोष साखरे यांचे विद्यार्थी हितासाठीचे असलेले काम आणि अनुभव, यामुळेच त्यांची निवड झाल्याचे सांगण्यात येत आहे. देशातील आरोग्याचा दर्जा सुधारावा आणि आरोग्यविषयक सुविधा मिळाले पाहिजे, यासाठी त्यांचा आग्रह आहे. या केंद्रीय अधिवेशनात निवड झाल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या