दि ९ सप्टेंबर २०२२ रोजी पासुन देगलुर बिलोली मतदार संघात तीन दिवसा पासुन वादळी वार्यासह अती मुसळधार पाउस होत आहे. यात खरीब पिक मुग, उडीद, सोयाबीन, कापुस ईतर पिकांसह भाजीपाले फळबाग याचे आतोनात नूकासान झाले आहे. अशी तक्रार जिल्हाधिकारी, मुख्यंमञी साहेब, विभागीय आयुक्त औरगाबाद, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी, याच्या कडे वंचित बहूजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन यानी ईमेल द्वारे केली आहे.
तसेच या आगोदर पाऊस न पडल्यामुळे ३०% पिक हे करपुन गेले आहे तर आता सतत मुसळधार पाउस पडुन सोयाबीन उडीद मुग कापुस ईतर पिकाचे आतोनात नुकसान देगलुर-बिलोली मतदासंघातील सर्वच शेतकर्याचे व पिकाचे नुकसान झाल्या मुळे सरसकट तात्काळ हेक्टरी ५० हजार मदत द्यावे व पिक विमा मंजुर करावे. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन यानी केली आहे.
तसेच प्रशासन शेतकर्याना नूकसान भरपाई व पिक विमा त्वरीत मंजुर न केल्यास पुढील काळात शेतकर्याना सोबत घेउन जनअंदोलन ईशारा ही वंचित बहुजन आघाडी कडुन देण्यात आला आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy