सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना स्वाधार, शिष्यवृत्ती, बार्टी फेलोशिप साठी निवेदन देणार-नसोसवायएफ

निवेदक प्रा.सतिश वागरे (राज्य प्रवक्ता, नसोसवायएफ)
9730629229 
डाँ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची २०१९-२०२० मधील बाकी राहिलेली रक्कम देण्यात यावी, २०२०- २०२१ या शै.वर्षा चे अर्ज स्वीकारणे डाँ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बार्टी) मार्फत २०१९-२०२०, २०२०-२०२१ या शै.वर्षातील एम.फिल,पि.एचडी च्या सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिफ देण्यात यावी या साठी मा. सामाजिक न्याय मंत्री यांना नँशनल एससी/एसटी/ओबीसी/ स्टुडंट अँन्ड युथ फ्रन्ट (नसोसवायएफ) निवेदन देणार आहे. 

शैक्षणिक वर्षे २०१९-२०२० या वर्षातील विद्यार्थ्यांना आद्याप पर्यंत डाँ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची पुर्ण रक्कम मिळाली नाही.तसेच शै.वर्ष २०२०-२०२१ या वर्षात डाँ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज समाजकल्याण विभागाने ही स्वीकारले नाहीत.
डाँ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बार्टी) ने शै.वर्षे २०१९-२०२० आणि २०२०-२०२१ या वर्षात राज्यातील एम.फिल,पि.एचडी,च्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी ची फेलोशिफ चे अर्ज आद्यपर्यत मागवण्यात आले नाहीत.
राज्यातील अनुसूचीत जाती च्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हित संवर्धना साठी राज्य सरकारने डाँ.बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना सुरू केली. राज्यातील अनुसूचीत जाती च्या विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती ही हालाखीची आहे.२०२० पासून सुरु आसलेल्या ताळेबंदी मुळे अनेकांचा रोजगार गेला आहे.
आशा परिस्थितीत राज्यातील अनुसूचीत जाती च्या विद्यार्थ्यांनी कसे शिक्षण घ्याचे त्यात राज्य सरकारने सुरू केले स्वाधार योजने ची २०१९-२०२० या शै.वर्षाची पुर्ण रक्कम ही विद्यार्थ्यांना मिळाली तसेच२०२०-२०२१ या शै.वर्षाचे अर्ज अद्याप ही समाजकल्याण विभागाने स्विकारले नाही.
डाँ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बार्टी) या केंद्राची स्थापना हि राज्यातील अनुसूचीत जाती च्या संशोधक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत तसेच या समाजातील संशोधकाना वाव देण्यासाठी करण्यात आली होती. पण बार्टी मार्फत २०१९-२०२०, २०२०-२०२१ या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी फेलोशिफ चे अर्ज मांगवण्यात आले नाहीत तर दुसरी कडे शाहु महाराज संशोधन व प्रशिक्षण केंद्र सार्थी नी मराठा जाती च्या राज्यातील सर्व एम.फिल,पि.एचडी च्या विद्यार्थ्यांना हि फेलोशिफ जाहिर केली आहे तसे सार्थी मार्फत अर्ज ही मागवण्य आले आहेत.
मग अनुसूचीत जाती च्या राज्यातील सर्व संशोधक विद्यार्थ्यांना बार्टी मार्फत ही फेलोशिफ का दिली जात नाही.हा अनुसूचीत जातीच्या संशोधक विद्यार्थ्यां सोबत भेदभाव आहे आशी आमची खात्री झाली आहे.
हा भेदभाव थांबने गरजे चे आहे .समाजिक न्याय विभागात पैसे असतांना सुधा आपल्या समाजकल्याण मंत्री व आधिकार्यानी अनुसूचीत जाती च्या विद्यार्थ्यांना जाणूनबुजून या योजना पासून अलिप्त ठेवले आहे.तसेच १०५ करोड रुपये सामाजिक न्याय विभागाचे परत केले आहेत. हा आम्हाच्यावर अन्याय आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे आणी सामाजिक न्याय मंत्री यांना आँनलाईन पद्धतीने अनेक वेळा निवेदने संघटने कडून वारंवार दिले गेले आहेत. सदरील मागण्या लवकरात लवकर पुर्ण कराव्यात आमच्या मागण्या
१) २०१९-२०२० या शै.वर्षातील डाँ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधारची बाकी असनारी रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करण्यात यावी.
२) २०२०-२०२१ या शै.वर्षाचे स्वाधार चे अर्ज समाजकल्यान विभागाने त्वरित स्विकारावे.
३) डाँ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र बार्टी मार्फत राज्यातील सर्व अनुसूचीत जातीतील ए.फिल.,पि.एचडी संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिफ साठी बार्टी मार्फत अर्ज मांगवण्यात यावे.
४) डां.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र बार्टी मार्फत राज्यातील १०० संशोधक विद्यार्थ्यांना पोस्ट डाँक्टरेट ची फेलोशिफ सुरु करण्यात यावी. या सर्व मागण्यासाठी नँशनल एससी/एसटी/ओबीसी स्टुडंट अँन्ड युथ फ्रन्ट (नसोसवायएफ) चे राज्य प्रवक्ता प्रा. सतिश वागरे, जिल्हा प्रभारी संदिप जोंधळे,जिल्हा प्रवक्ता मनोहर सोनकांबळे, विद्यापीठ प्रतिनिधी अनुपम सोनाळे आदी निवेदन देणार आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या