१५ व्या वित्त आयोगातून केलेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी…! 

[ नायगांव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
   नायगांव तालुक्यातील हिपरगा जानेराव येथील ग्रामपंचायतने पंधराव्या वित्त आयोगातून गावामध्ये विविध विकास कामे केली परतू ती निकृष्ट दर्जाची असून थातूर मातूर कामे करून ती दाखवली व लाखोचे बिल उचलण्यात आली आहेत त्या भ्रष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी हिप्परगा जानेराव येथील सामाजीक कार्यकर्ते सुरेश उध्दवराव कदम व नंदकिशोर यादवराव कदम यांनी गरविकास अधिकारी पंचायत समिती नायगांव यांना दिला होता. परंतू गटविकास अधिकारी यांनी अघाप पर्यंत चौकशी केली नसल्या कारणाने दि. 11 एप्रिल 2025 रोजी पंचायत समिती समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे .
अधिक माहिती अशी कि, नायगांव तालुक्यातील हिपरगा जानेराव येथील ग्रामपंचायतने मागील वर्षी ग्रामपंचायत अंतर्गत पंघराव्या वित आयोगातून गावामध्ये विविध विकास कामे हाती घेतली होती परंतू ती कामे निकृष्ट दर्जाची काण्यात आली आहेत थातूर मातूर कामे करून नांदेड येथील एका हॉटेलवर बसून या कामाची बिले तयार करण्यात आली तशी माहिती पंचायत समितीचे गरविकास अधिकारी नायगाव या देवून त्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुरेश कदम व उध्दव कदम यांनी करूनही त्या कामाची चौकशी झाली नाही त्या करीता येत्या 11 एप्रिल 2025 रोजी पंचायत समिती नायगांव येथे आत्मदहन करण्याचा इशारा कदम यांनी दिला आहे. 
   बारावा वित्त आयोग असो किंवा पंधरावा वित्त आयोग यातून आलेला विकास निधी हा विकासासाठी वापरण्यात येतो परंतू हिप्परगा जानेराव येथील ग्राम विकास अधिकारी यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या शी संगनमत करीत गावाती रस्ता नालीचे बांधकाम अशी अनेक कामे थातूर मातूर करून नांदेड येथील एका हॉटेल मध्ये बसून ती बिले तयार करण्यात आली आणि त्याची उलथा पालथ करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात चौकशी करण्याची मागणी करूनही चौकशी करण्यात आली नाही त्यामुळे येत्या 11 एप्रिल रोजी पंचायत समिती नायगांव येथे आत्मदहन करण्याचा इशारा सुरेश कदम व उद्धव कदम यांनी दिला आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या