लोहा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांचा मनमानी कारभार चालतो या कार्यालयांवर वरिष्ठांनी लक्ष देवून लगाम घातला पाहिजे अशी मागणी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने करत आहेत.या कार्यालयात १२ पैकी ३/४ कर्मचारीच हजर राहतात. तालुका कृषी अधिकारी यांचे राहिले नाही नियंत्रण जिल्हा कृषी अधिक्षकांनी त्वरित लक्ष देऊन चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी.तालुक्यात कृषी सहाय्यक जवळपास ३२ कर्मचारी आहेत.
परंतु प्रत्यक्षात एकही कर्मचारी कामावर येत नाही घरी बसून कामे करत आहेत.लोहा तालुक्यात कृषी विभागातील अधिकारी अरूण घुमनवाड हे कार्यालयात नेहमीच गैरहजर राहतात तालुक्यातुन कोणीही केव्हाही फोन केला असता अरेरावीची भाषा करतात आमच्या पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब बुध्दे यांनी काल दि.२९ डिसेंबर रोजी कृषी कार्यालय येथे भेट दिली असता मी बाहेर गावी दौऱ्यात आहे असे उडवाउडवीचे उत्तरे फोन वरून दिली व मला ड्यूटी करावी वाटत नाही असे सांगितले. अधिकारी-कर्मचारी वेळेवर कार्यालयात हजर नसल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या कामाकाजावर विपरित परिणाम होऊन त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१वर वसलेला लोहा शहर आहे.शेतक-यासाठी वेगवेगळ्या योजना शासकीय स्तरावर आहेत मात्र या योजनेचा लाभ येथील शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी अनेक महत्वाच्या योजना कृषी विभागात आणलेल्या आहेत. परंतू, योजना राबवण्यासाठी तालुका कृषी अधिकारी आणि कर्मचारी हे निष्काळजीपणा करत आहेत यांनी जास्तीत जास्त वेळ कार्यालयात व शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून कामें केली तरच या भागातील शेती विकसित होईल.कामात अनियमितता केल्याने लखपती योजना नुसत्या कागदावरच राहतील असा आरोप तालुक्यातील अनेक शेतकरी करत आहेत.
नेहमीच सगळेजण कधीच कार्यालयात वेळेवर येत नाहीत. त्यामुळे कार्यालयाचे कामकाज पूर्णवेळ नसल्याने त्याचा परिणाम कामकाजावर होतो आहे.त्याचा फटका गरीब शेतकऱ्यांना बसून त्यांची कामे अनेक दिवस खोळंबून पडलेली असतात.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy