नरसी ग्रामपंचायतकडे स्मशानभूमीसाठी जमिनीची मागणी

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
नरसी येथे सार्वजनिक स्मशानभूमी असल्यामुळे आर्य वैश्य समाज बांधवांच्या वतीने स्वतंत्र स्मशानभूमीसाठी एक एकर जमिनीची नरसी ग्रामपंचायतकडे शिष्टमंडळाच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी केली आहे. नायगाव तालुक्यातील नरसी हे शहर आंध्रा महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडूच्या मुख्य रस्त्यावर असल्यामुळे येथे बाजारपेठ मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी सार्वजनिक स्मशानभूमी असल्याने आर्य वैश्य समाज बांधवाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे.
परंतु आर्य वैश्य समाज बांधवांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी नसल्यामुळे नरसी ग्रामपंचायतच्या वतीने आर्य वैश्य समाज बांधवांसाठी स्वतंत्र स्मशानभूमीसाठी एक एकर जमीन द्यावी अशी मागणी आर्य वैश्य समाज बांधवांच्या मंडळाच्या वतीने नरसी येथील ग्रामपंचायतचे सरपंच गजानन पाटील भिलवंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
या निवेदनावर समाजाचे अध्यक्ष विठ्ठल पाटील चिद्रेवार, उपाध्यक्ष साईनाथ सावकार मद्रेवार, सचिव अनिल सीरमवार, सुधाकर लाभशेटवार, दासराव धमपलवार, गजानन वट्टमवार, पांडुरंग नारलावार, विनायक संगणवार, पुरुषोत्तम पदमवार, श्रीनिवास गादेवार, संतोष जुक्कलकर, वैजनाथ संगणवार, बालाजी वट्टमवार, दिलीप बच्चेवार, प्रभाकर कवटीकवार, मनोज काप्रतवार, नारायण देवशेटवार, बालाजी नारलावार , नवनाथ कवटीकवार,मुरलीधर देमेवार,बालाजी पाळेकर, बालाजी काशेटवार, बालाजी चिंतावार, शिवकुमार काप्रतवार, अनंत पबीतवार, आदीसह असंख्य आर्य वैश्य समाज बांधवांची उपस्थिती होती. 
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या