सुतार- लोहार समाजाला नागरी कायद्याअंतर्गत शेत जमीन देण्यात याव्यात – विश्वकर्मा समाजाच्या नेत्या अर्चना विनायक सुतार !

[ विशेष प्रतिनिधी – शिवानंद पांचाळ नायगांवकर ]
छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना महाआघाडीने सुरू करून अठरा पगड जातीत बारा बलुतेदार उदरनिर्वाहात सक्षम व्हावा, बाराबलुतेदार सन्मान योजना सुरू करून गावगाड्याच्या कर्मात पिढ्यानपिढ्या शेकडो वर्षापासुन कार्यरत असलेल्यांना शेतकऱ्यांचे शेतीचे अवजारे, शेतकऱ्यांचे लाकडी लोंखडी कामाच्या सेवेत असलेल्या सुतार / लोहार समाजाला शेत जमिनी देण्यात यावी अशी मागणी सांगली येथील विश्वकर्मा समाजाच्या नेत्या सौ.अर्चना विनायक सुतार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
निसर्गाच्या आसमानी संकटामुळे शेतकरी हतबल / बेजार झाला आहे , त्यांचा हाता तोंडाशी आलेला घास निसर्ग दर वर्षी हिसकावून घेत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना देखील आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामध्ये शेतकरी पुर्णपणे कर्ज बाजारी झाला आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहे.
सुतार / लोहार समाजाकडे काम शिल्लक राहीले नाही. शेतकऱ्यांच्या बलुत्यावर गावातील लाकडी वस्तु तसेच लोंखडी कामावर अवलंबून असलेला वर्ग शहराकडे धाव घेत आहे.
तिथे मिळेल ती मजुरी काम करत आहे. कलाकुशल कौशल्य प्रावीण्य असलेला वर्ग अस्ताव्यस्त होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर दिसून येत आहे. शासनाने नागरी जमीन ( कमाल धारणा व विनियोग ) अधिनियम १९७६ प्रमाणे १७ जानेवारी २०१८ चा मंत्रिमंडाळाच्या नियमाप्रमाणे ग्रामीण भागातील सुतार / लोहार जातींना शासनाची दोन हेक्टर जमीन उपलब्ध करून द्यावी. तो ग्रामीण भागात शेतकरी व गाव गाड्यास लाकडी लोंखडी साहित्य पुरवू शकतो यातून हा वर्ग ग्रामीण भागात स्थिर राहू शकेल पूर्वीच्या शासनाने अश्या प्रकारच्या शेती वाटप केल्या आहेत.
कृपया नागरी जमीन कायद्या अंतर्गत सुतार / लोहार यांना शेती देण्यात याव्यात, शासन‌ या मागण्यांचा सकारात्मक विचार करील अशी अपेक्षाही विश्वकर्मिय नेत्या अर्चनाताई सुतार यांनी व्यक्त केल्या आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या