बिलोली नगर परिषदेला कायम स्वरूपी मुख्याधिकारी देण्याची मागणी !

( बिलोली ता.प्र – सुनिल जेठे )
 बिलोली नगर परिषदेला कायम स्वरूपी मुख्याधिकारी देण्याची मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. बिलोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अमोल चौधरी यांची बदली झाल्यानंतर कुंडलवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना अतिरिक्त पदभार सांभाळला होता.
त्या नंतर एप्रिल महिन्यात बिलोली तहसीलचे तहसीलदार श्रीकांत निळे यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला. बिलोली नगर परिषदेत प्रभारी राज असल्यामुळे जनतेची विकास कामे खोळंबली आहेत. शहरात नियमीत पाणी पुरवठा होत नाही.राज्यमार्गावरील पथदिवे बंद आहे, नागरिकांचे प्रमाण पत्र, घराचे नाव परिवर्तन वेळेवर होत नाही, कर्मचारी ऑफिसमध्ये वेळेवर राहत नाहीत, शहरात स्वछता कामावर कोणाचे नियंत्रण नाही.
कायम स्वरुपी मुख्याधिकारी नसल्याने कर्मचा-यावर प्रभारी मुख्याधिकारी यांचे नियंत्रण नाही.विशेष असे की तहसीलदार श्रीकांत निळे यांना बिलोली तालुक्याची जवाबदारी असल्याने त्याना न.प च्या कामकाजा साठी वेळ मिळत नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. शहरात जनतेला भौतिक सुविधा उपलब्ध होत नाही. शहरातील विकास कामे खोळंबली आहेत. 
नगर परिषदे मध्ये जनतेच्या अनेक तक्रारी वाढल्या आहेत. मागासलेल्या बिलोली शहरातील विकास कामे करण्यासाठी नाईलाजाने कायमस्वरूपी मुख्याधिकारी यांची नियुक्ती देण्याची मागणी नागरीकानी जिल्हाधिकारी नांदेड यांचेकडे एका लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन प्रत उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक न.प. बिलोली यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनावर अ.भा.भृष्टाचार निर्मुलन संघर्ष समीतीचे जिल्हा उपाध्यक्ष ए.जी. कुरेशी, सामाजिक कार्यकर्ता सय्यद रियाज., शिवसेनेचे रमेश पवनकर, संजयकुमार बिलोलीकर,शेख फारुख अहेमद,शेख वाजिदअब्दुल्ला आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या