डॉ बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी जागा देण्याची मागणी !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
       भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी शहरात जागा उपलब्ध करून देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे यांनी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना दिले आहे.
          कुंडलवाडी शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात डॉ बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचे अनुयायी राहतात,या दोन्ही महापुरुषांनी देशाला व महाराष्ट्राला नवी दिशा व विचार दिले आहेत.नव्या पिढी समोर त्यांच्या विचाराचा आदर्श उभा राहावा या अनुषंगाने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी शहरात नगरपालिका प्रशासनाने जागा उपलब्ध करून द्यावे, अशा आशयाचे निवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे यांनी दिले आहे.
           यावेळी पत्रकार सिद्धार्थ कांबळे, अजय वाघमारे, जयराज कंपाळे, यादव वाघमारे,उपस्थित होते. या निवेदनावर संतोष कंपाळे,हनमंत कंपाळे, हनमंत हातोडे, संतोष वाघमारे, अभिनंदन वाघमारे, किरण कांबळे, सुगत हातोडे, प्रल्हाद हातोडे, साहेबराव वाघमारे,गजानन कंपाळे, मारोती हातोडे, किरण कपाळे, अजय भोसले, आशिष भोसले, शंकर कंपाळे, राहुल कांबळे, राजरतन कांबळे, हनमंत वाघमारे,सुशील हातोडे,सुदर्शन कांबळे,शैलेश गांजरे, आदी समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या