■ तहसीलदारांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केला पत्रव्यवहार !!
[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील शहरातील नागरिकांना शासनाच्या वतीने शेतकरी योजने अंतर्गत शेतकरी कुटुंबियांना शासन मान्य राशन मिळत होते. परंतु सदरील शासनाने शेतकरी योजना बंद केले असून बंद केलेली योजना लवकरात लवकर पुर्ववत चालू करावे,अशी मागणी येथील माजी नगरसेविका प्रयागबाई शिरामे यांनी तहसीलदार यांना दि. २१ नोव्हेंबर रोजी निवेदनाद्वारे मागणी केली होती,त्यांच्या मागणीची तहसीलदार बिलोली यांनी तात्काळ दखल घेत बंद केलेले राशन पुर्ववत मिळवून देण्याची मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पत्रव्यवहार करून केली आहे..
कुंडलवाडी शहरातील शासनाच्या वतीने शेतकरी योजने अंतर्गत शेतकरी कुटुंबियांना शासन मान्य राशन मिळत होते. परंतु सदरील शासनाने शेतकरी योजना बंद केले असून याचा परिणाम शेतकरी कुटुंब, अल्पभूधारक व मध्यम वर्गीय शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे.तसेच काही नागरिकांना शेती अद्याप नाही पण शेतकरी योजनेत नाव पडल्यामुळे त्यांचे राशन बंद झाले आहे,आशा सर्व नागरिकांना शेतकरी योजने मधून वगळून अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करुन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावे व शेतकऱ्यांचे बंद पडलेले राशन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी येथील नगर पालिकेचे माजी नगरसेविका प्रयागबाई मुरलीधर शिरामे यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केले होते. त्या अनुषंगाने तहसीलदार बिलोली यांनी दखल घेऊन तात्काळ जिल्हा पुरवठा अधिकारी यांना बंद केलेले राशन पुर्ववत मिळवून देण्याची व्यवस्था करण्याची मागणी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली आहे.
तसेच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सदरील नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन तात्काळ शासनाच्या स्तरावरून शेतकरी योजने अंतर्गत शेतकरी कुटुंबियांना व अल्पभूधारक शेतकऱ्यांना राशन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy