कुंडलवाडी शहरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
येथील पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या शहर व परिसरातील गावांमध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले असून फोफावलेले अवैध धंदे तत्काळ बंद करून अवैध धंदे करण्याऱ्या माफियांवर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सहयक पोलीस निरीक्षक संतोष शेकडे यांना निवेदन देऊन केले आहे.

कुंडलवाडी पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या शहर व परिसरातील गावांमध्ये गेल्या अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात अवैध रित्या दारू विक्री, मटका, खुल्लेआम गुटखा विक्री, जुगार, रात्रीच्या वेळी अवैध रित्या रेती तस्करी, आदीसह अनेक अवैध धंदे सरास चालू आहेत. सदरील चालू असलेले अवैध धंदे बंद करण्याची मागणी शिवसेना शहर शाखेच्या वतीने साहयक पोलीस निरीक्षक संतोष शेकडे यांच्या कडे निवेदन देऊन केली आहे. या निवेदनावर शहरप्रमुख लक्ष्मण गंगोने, गंगाधर शिंदे, चंद्रशेखर भोरे, संतोष कंपाळे, अजय कांबळे आदींच्या स्वाक्षरी आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या