घुंगराळा-तलबिड निसर्ग पर्यटन केंद्र व तिर्थक्षेत्र तिर्थस्थळासाठी निधीची तरतूद करा – पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांच्याकडे लक्ष्मणराव मा.भवरे यांची मागणी

[ नायगांव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]

घुंगराळा-तलबिड निसर्ग पर्यटन केंद्र व तिर्थक्षेत्र/तिर्थस्थळासाठी भरिव निधीची तरतूद करा अशी मागणी राज्याचे ग्रामविकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांच्याकडे नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुका प्रभारी आणि राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मा.भवरे यांनी आज निवेदनाद्वारे केली असून याबाबत त्यांनी आपण स्वतः लक्ष देऊ असे आश्वासन दिले आहे.

पालकमंत्री मा.ना.गिरीष महाजन यांच्या नांदेड दौऱ्यात आज लक्ष्मणराव मा.भवरे यांनी प्रत्यक्ष भेट घेतली.नायगांवचे आ.राजेश पवार यांचीही यावेळी उपस्थिती होती. घुंगराळ्यात डोंगराईत वसलेले येथिल जागृत देवस्थान श्री.म्हाळसाकांत मंदिर (श्री.खंडोबा मंदिर) असून प्रारंभी आपणच केलेल्या पाठपुराव्यामुळे याठिकाणी तिर्थस्थळाचा दर्जा यापूर्वीच मिळाला असून या परिसरासह श्री.महादेव मंदिर तलबिड (गगणबिड) या लगतच्या परिसरातील संपूर्ण वनजमिन संपादित करून येथे निसर्ग/ वनपर्यटन केंद्र मंजुर करावे व भरिव निधीची तरतूद करून येथे विकास कामे करावीत याबाबत पूनश्च आपण सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर महाराष्ट्र राज्य निसर्ग पर्यटन मंडळ, नागपूर यांनी दि.२७ जुलै २०१७ रोजीच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत या निसर्ग पर्यटन केंद्रास मान्यता दिली आहे.
परंतू,स्थानिक विभागाने सातत्याने विकास आराखडा योग्यतेने सादर केला नसल्यानेच तो त्रुटीत राहून यासाठी आजपर्यंत निधीची तरतूद झाली नाही.स्थानिक वनविभाग, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन मंडळ, नागपूर व वन मंञालयस्तरावर आपण सामाजिक भावनेतून सातत्याने पाठपुरावा करित असून राज्याचे तत्कालीन वनमंञी मा.ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्याच माध्यमातून या प्रस्तावाला यापूर्वी मंजूरी मिळाली होती सध्याच्या सरकारमध्येही त्यांच्याकडेच या वन मंत्रालयाचा कार्यभार असल्याने त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळेलच.आपणही स्वतः याबाबत पुढाकार घेऊन शासनाकडून तसेच,जिल्हा नियोजन समितीच्याही माध्यमातून भरिव निधीच्या तरतूदीसह त्यातून याठिकाणी दर्जेदार विकास कामांतून या परिसराचा सर्वागीण विकास करावा असी अपेक्षा लक्ष्मणराव मा.भवरे यांनी आपल्या निवेदनातून व्यक्त केली आहे.
आपण याबाबत निश्चित पणे लक्ष देऊन शासन व जिल्हा नियोजन समितीकडूनही भरीव निधीची तरतूद करण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन ना.महाजन यांनी यावेळी दिले.

“भाजपा नेते बालाजी बच्चेवार यांची मागणी. दरम्यान भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व माजी जि.प.सदस्य बालाजी बच्चेवार यांनीही राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा, जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.गिरीष महाजन यांना आज निवेदनाद्वारे घुंगराळा- तलबिड निसर्ग पर्यटन केंद्र व तिर्थक्षेत्र/तिर्थस्थळासाठी निधीची तरतूद करा अशी मागणी केली.”

www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या