तृतीयपंथीना प्रवासासाठी मोफत बससेवा व घरकुल योजना लागू करावी,रेखाताई बनसोडे देवकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

[ नायगाव बा. ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
  महाराष्ट्रातील तृतीयपंथी वर्गांना आजवर कुठलीही व कोणतीही योजना लागू करण्यात आली नसल्याने मोफत प्रवासासाठी बससेवा आणि हक्काचे घरकुल शासनाने द्यावे या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र विज्ञान तंत्रज्ञान व कौशल्य विकासचे प्रदेश राज्य संघटक रेखाताई बनसोडे देवकर यांनी दिले आहे.
  शासनाने महिला पुरुष यांना बस सेवा प्रवास करण्यासाठी योजना लागू केली त्याचा ते लाभ घेत आहेत अनेक कुटुंबांना घरकुल योजना सुद्धा देण्यात आली परंतु महाराष्ट्रातील बोटावर मोजणे इतके तृतीयपंथी वर्गांना आजवर कोणत्याच योजनेचा लाभ मिळाला नाही. भारतीय संविधान सर्वांना हक्क व अधिकार दिले असले तरी तृतीयपंथी यांना कोणतीही योजना लागू करण्यात आली नाही त्यामुळे एक प्रकारे हा अन्यायच होय,तेव्हा राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व तृतीयपंथी वर्गांना मोफत बस सेवा योजना लागू करावी आणि हक्काचे घरकुल योजना मंजूर करावी अशा मागणीचे निवेदन विज्ञान-तंत्रज्ञान व कौशल्य विकासचे राज्य संघटक रेखाताई देवकर बनसोडे यांनी मुख्यमंत्री दिले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या