कवळे गुरुजी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली मागणी !!

[ नायगाव प्रतिनिधी-गजानन चौधरी ]
मोफत बियाणे,खते,व चारा डेपो तात्काळ देण्याचे निवेदन आज नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी यांनी केले.
नायगाव बाजार तालुका प्रतिनिधी सध्याची दुष्काळजन्य परीस्थीती पाहता नायगांव मतदार संघातील नायगांव उमरी, धर्माबाद या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे, खते व पिण्याचे पाणी तसेच जनावारांसाठी चारा डेपो तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदाही खरीपाची पहीली पेरणी अल्पपावसामुळे वाया गेली आहे दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना नायगांव बाजार तालुका प्रतिनिधी शासनाकडुन मोफत बियाणे, खते व पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देवुन जनावारांसाठी ठीकठीकाणी चारा डेपो तात्काळ उभारण्यात यावे. खरीपाच्या पहील्या पेरणीचा खर्च वाया गेल्यामुळे मतदारसंघातील शेतकरी अगोदरच अर्थीक अडचणीत आहे.
त्यामुळे उपरोक्त मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या