अर्जापूर येथील करण्यात येणारे नाली बांधकाम गावाबाहेरपर्यंत करा; अन्यथा काम बंद करा यासाठी मा.उपअभियंता अधिकारी यांना निवेदनाद्वारे आमरण उपोषणाचा ईशारा !

[ बिलोली प्रतिनिधी – सुनिल जेठे ]
बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी ते धर्माबाद रस्त्याचे काम मोठ्या तेजिने होत आहे, अर्जापूर येथे रस्त्याच्या दोन्ही बाजुणे मोठ्या नालीचे काम मोठ्या झपाट्याने होत असलेले नालीचे काम कांही घरापर्यंतच केले आहे.
येथील नालीचे पाणी नागरिकांच्या घरात घुसेल आणि आमच्या संसाराची वाट लागेल, म्हणून नाली बाधकाम संबंधित कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडे नागरिकांनी धाव घेतली आहे. नाली बांधकाम हे अर्धवट गाव वस्तीपर्यंतच केले जात असल्याने नालीचे काम पुर्ण गावाबाहेर पर्यंत करण्यासाठी मागणी केली आहे.

नाली बांधकाम हे गावाबाहेर पर्यंत करण्यासाठी वाढिव बजट मंजुरीची तरतुद करुन द्यावे आणि नालीचे पाणी गावाबाहेर काढून द्यावे अन्यथा संबंधित सामाजिक बांधकाम उपअभियंता अधिकारी कार्यालय बिलोली समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा ईशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

तर माहितीस्तव सादर म्हणून निवेदन मा.उपविभागीय अधिकारी बिलोली, मा.तहसिलदार बिलोली यांना ही दिले.
सदर निवेदनावर शेख ईस्माईल महेबुबसाब, शेख खदिर, लतिफ मिरासाब, शे.सलिम हुसेनसाब, शेख ईमामसाब, शेख मोईन, पाशा मौलासाब, सायल्लू शेट्टिवार, लालु संगन्ना शेट्टीवार, शेख सुलेमान याच्यासह आदी रहिवासी नागरिकांनी स्वाक्षरी केलेले लेखी तक्रार हे संबंधित नाली बांधकाम गुत्तेदाराने तक्रारी चा विचार करुन नालीसाठी बजट रक्कम मंजुर मिळावे पर्यंत करावा अशी ही मुस्लिम बांधवात होत आहे.
Www.massmaharashtra.com  

ताज्या बातम्या