बिलोली देगलुर तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतीतील पिकाचे नूकसान झाल्यामुळे त्वरीत हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाई द्या – शंकर महाजन !

[ बिलोली ]
बिलोली तालुक्यात 6सप्टेंबर पासुन मुसळधार पाउस चालुच आहे. या मुळे तालुक्यातील ९०% शेतकर्‍याचे शेतात पाणी घुसुन सोयाबीन, उडीद, कापुस, तुर ईत्यादी पिकाचे आतोनात नुकसान झाले आहे.
या मुळे शेतकरी वर्गात अंत्यत घबराटीचे वातावरण निर्मान झाले आहे.या मुळ शासनाकडे असलेल्या आतीवृष्टी पावसाच्या नोदी वरुन नुकसना भारपाई द्यावे व विमा कंपनीला १००% नुकासन भरपाई देण्याचे आदेश द्या असे ईमेल द्वारे तक्रार वचिंत बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रा.प सदस्य शंकर महाजन यानी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

तसेच त्वरीत शेतकरी बाधवाना दिलासा देण्यासाठी हेक्टीरी पन्नास हजार नुकसान भरपाई पधरा दिवसात द्यावे.व तसेच विमा कंपनीला १००% नुकसान भरपाई देण्याचे आदेश द्यावे.तसेच जाच्या घराची पडझड झाली अशांनाही आर्थीक मदत द्यावी.
अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकर्‍याना सोबत घेउन प्रशासनाला घेराव घालण्यात येईल यात कायदा व सुवेवस्थेचा प्रक्ष्न निर्मान झाल्यास यास सर्वस्वी आपन व आपले प्रशासन जबाबदार राहाल असा ईशारा वचिंत बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रा.प.सदस्य शंकर महाजन यानी दिले आहे.

या निवेदनाची प्रती मुख्यंमञी साहेब, विभागीय आयुक्त औरगाबाद, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, तालुका कृषी अधिकार्‍याना देण्यात आले.

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या