नांदेड जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची मागणी !

• राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केले मागणी !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
नांदेड जिल्ह्यातील आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त आहेत. यात प्रामुख्याने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र याठिकाणी असणारे आशा वर्कर ,परिचर, औषधनिर्माता, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका अशी अनेक पदे रिक्त असून ही पदे तात्काळ भरण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी आरोग्यमंत्री राजेशभैया टोपे यांच्याकडे केली आहे.
विशेषतः जिल्ह्यात आशा वर्कर ची अनेक पदे रिक्त आहेत. ती पदे तात्काळ भरणे गरजेचे आहे. तसेच आशा वर्कर यांच्या मानधनात ही वाढ करावी अशी मागणी आरोग्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या