पदवी व पदव्युत्तर परिक्षा अनिश्चितकाल पर्यत पुढे ढकलाव्या..

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा आता सुधारित वेळापत्रकानुसार होतील. सदरील परीक्षा कोरोनाच्या सावटाखाली घेऊन विद्यार्थ्यांंच्या आयुष्याशी प्रशासन खेळत आहे.
सध्या विद्यापीठाच्या नविन परिक्षा परिपत्रकानुसार परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी आँनलाईन पद्धतीने परिक्षा द्यावी असे विद्यापीठ प्रशासनाचे म्हणंन आहे परंतु विद्यार्थी आँनलाईन परिक्षेसाठी लाँगिन झाला नाही तर तो संपर्क कोणाशी करणार,कोरोना असल्यामुळे तो घराच्या बाहेर येऊ शकत नाही. जर तो घराच्या बाहेर आला व त्याला कोविड-19 ची लागन झाली तर त्याची जवाबदारी विद्यापीठ प्रशासन घेईल का? नसोसवायएफ संघटनेची तशी इच्छा नाही की विद्यापीठ प्रशासनाने जबाबदारी घ्यावी, विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठातील परिक्षा पुढे ढकलाव्या व कोरोना परिस्थिती संपे पर्यत परिक्षेचा विचार करू नये. तसेच विद्यापीठातील अनेक कर्मचारी व अधिकारी कोरोना संसर्गा झाल्यामुळे विद्यापीठात येऊ शकत नाहीत, कर्मचारी कमतरता असल्यामुळे परिक्षा विभागात जास्त लोड होईल त्या परिणामी विद्यार्थी आँनलाईन परिक्षे पासुन गेल्यावर्षी प्रमाणे वंचित राहू शकतात व त्याची पून: परिक्षा घेऊन हे वर्ष ही पुर्णच परिक्षेत जाईल. .
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशपातळीवर खबरदारी घेण्यात येत आहे. संपूर्ण देशा बरोबरच नांदेड हिंगोली परभणी लातुर येथेही लाँकडाऊन सदृश्य परिस्थिती आहे,त्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. विद्यापीठाने नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी आपल्या गावी परतले आहेत. महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट आहे.
अनेक महाविद्यालयात प्राध्यापक व कर्मचारी कोरानासंसर्ग झाले असून काही जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. स्वारातीम विद्यापीठांतर्गत सर्व संलग्नित पदव्युत्तर कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाच्या परीक्षा नियोजित वेळापत्रका ऐवजी आता सुधारित वेळापत्रकानुसार होणार आहेत. २५ एप्रिल पर्यत परिक्षा संपवायचे असे निर्देशाचे परिपत्रक विद्यापीठामार्फत आले आहेत. काही परिक्षा ह्या आँफलाईन पद्धतीने असून काही आँनलाईन पद्धतीने आहेत. ह्या अश्या कोरोना वाढत्या परिस्थितीत परिक्षेला विद्यार्थ्यांनी समोर जाणे हे धोक्याचे आहे.
तरी विद्यापीठाने परिक्षा लांबणीवर टाकाव्या, नँशनल एससी एसटी ओबीसी स्टुडंट अँन्ड युथ फ्रन्ट (नसोसवायएफ) मा. कुलगुरु यांनी परीक्षा घेण्यासंदर्भात घाई करु नये अशी विनंती आहे. विद्यापीठ प्रशासन जर परीक्षा लवकरात लवकर घेण्याच्या तयारीत असेल तर ही परिक्षा विद्यार्थ्यांच्या अरोग्यास घातक ठरू शकते. एक तर हिवाळी परीक्षेचा निकाल हा वेळेत लागला नाही, लॉकडाऊनमुळे व कोरोना विषाणूमुळे वर्ग होत नाहीत. जेवढे आँनलाईन शिकवणी वर्ग झाले त्यात सर्व विद्यार्थी मधील ग्रामीण भागातील विद्यार्थी मोबाईल नेटवर्क मुळे शिकू शकले नाहीत. त्यातच किती दिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होईल ह्याचा नियम नाही. हा कार्यकाळ अनिश्चित आहे.
त्यामुळे विद्यापीठाने सर्व गोष्टींचा विचार करुनच परीक्षा ह्या कोरोना कमी होत नाही तोपर्यत परिक्षा घेण्यात येऊ नये यासंदर्भात विचार करावा, असे निवेदन आँनलाईन ई-मेल च्या माध्यमातून मा.कुलगुरु, मा. प्र. कुलगुरु, मा.कुलसचिव, मा.संचालक, परिक्षा व मुल्यमापन मंडळ यांना प्रा. सतिश वागरे,राज्य प्रवक्ता,नसोसवायएफ यांनी विनंती केली आहे.

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या