पवित्र रमजान सनानिमित्त शहरात मुलभूत सुविधा व अखंडीत विद्युत पुरवठा ठेवण्याची मागणी !

मुख्याधिकारी व कनिष्ठ अभियंता यांच्याकडे मुस्लिम समाज बांधवांनी दिले निवेदन !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
       पवित्र रमजान महिन्याचा सनानिमित्त शहरातील चार मस्जिद व मुस्लिम समाज बांधवांच्या परिसरात साफसफाई,व मुलभूत सविधा उपलब्ध करून देण्याची व अखडीत विद्युत पुरवठा ठेवण्या सबंधी नगर परिषद मुख्याधिकारी व विद्युत वितरणचे कनिष्ठ अभियंता यांना मुस्लिम समाज बांधवांच्या शिष्टमंडळाने दि.20 मार्च रोजी निवेदन दिले.
      नगर परिषद मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना दिलेल्या निवेदनात असे नमुद करण्यात आले की,
मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र मास रमजान येणा-या 23 मार्च पासून आरंभ होत आहे.त्या निमित्ताने शहरातील चार मस्जिद परिसरात व मुस्लिम बहुबल प्रभागात गटारी काढण्यात यावे,विद्युत पथदिवे बसवण्यात यावे,अखंडीत पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात यावे,साफसफाई करण्यात यावी आदी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे.तसेच महावितरण कार्यालय कनिष्ठ अभियंता सुजय निकम यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले की,सद्या उन्हाळा ॠतू चालू असून पवित्र रमजान सनानिमित्त शहरातील चार मस्जिद मध्ये तरावी जमाज पठण केले जाते,त्यामुळे शहरातअखंडित वीज पुरवठा करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.या निवेदनावर पत्रकार मोहम्मद अफजल,शेख माजीद,पठाण रियाज,वाहेद अली,शेख फारूख,शेख ईमाम,शेख खालेद,पठाण मुजीब,पठाण मोबीन आदींचा स्वाक्ष-या आहेत…
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या