कुंडलवाडीतील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
              येथील शहरातील जोड मारोती मंदिर ते धर्माबाद रोड लगत असलेल्या व्यांकटेश्र्वर कमानी पर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते गंगाधर गट्टूवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे…..
                कुंडलवाडी शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत अतिक्रमण करण्यात आले असून या अतिक्रमणाकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.याच अनुषंगाने शहरातील मुख्य बाजार पेठेतील जोड मारोती मंदिर ते धर्माबाद रोड लगत असलेल्या व्यंकटेश्र्वर कमानी पर्यंतच्या रोडवर अनेक नागरिकांनी अनधिकृत अतिक्रमण केले आहे.
सदरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणत रहदारी असून या अतिक्रमणाचा फटका वाहन चालक व नागरिकांना बसत आहे. त्यामुळे सदरील रस्त्यावर नवीन सी सी रस्त्या होण्याच्या अगोदर या रस्त्यावरील अतिक्रमण नगरपालिका प्रशासनाने तत्काळ काढून रहदारीसाठी रस्ता मोकळा करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गंगाधर गट्टूवार यांनी मुख्याधिकारी आर. जी.चौहान यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.सदरील मागणी पूर्ण न झाल्यास नगरपालिके समोर उपोषणास बसण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या