कुंडलवाडी शहरातील डॉ.आंबेडकर नगर येथील बोअर दुरुस्ती करण्याची मागणी !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
शहरातील डॉ.आंबेडकर नगर भागातील बोअर नादुरुस्त झाले आहे.बोअरवेल चे स्टार्टर खराब झाले असून बोअर वेलची वायरिंगही अस्तव्यस्त पडली आहे. अशा परिस्थितीत बोअर चालू करण्यासाठी गेले असता स्पार्किंग होत असल्याने शॉक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.बोअर वेल नादुरुस्त असल्याने या भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
नगरपालिका प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन बोअरचे स्टार्टर बसवण्यात येऊन नादुरुस्त बोअर दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी कुंडलवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना या भागातील रहिवासी चंद्रकांत कांबळे, सुहास देवकरे आदी जणांनी दि.२९ मे रोजी निवेदनाद्वारे केली आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या