बिलोली तहसिल कार्यालयाचे नायब तहसीलदार चौहान यांची तात्काळ बदलीची मागणी – महसूल आयुक्त औरंगाबाद यांच्या कडे तक्रार
[ बिलोली तालुका प्रतिनिधी – सुनिल जेठे ]
बिलोली तहसिल कार्यालयातील महसूल विभागाचे सद्या कार्यारत असलेले नायब तहसीलदार आर.जी. चौहान यांची नियमानुसार बदली न होता एकाच बिलोली तहसिल कार्यालय येथे बरेच वर्षा पासून निवडणूक विभागात काम करुन महसुल विभागात खुर्चीवर विराजमान झाले आहेत.
आता पर्यंत अनेक कर्मचाऱ्यांचे बदली झाले परंतु चौहान यांना नियम लागू का होत नाही? व त्यांना प्रत्येक वेळी अभय देण्याचे काम कोणामुळे होत आहे? हे मात्र नकीच गोड बंगाल गुलदस्त्यात आहे. चौहान यांची तात्काळ बदली करण्यात यावी म्हणून एका निवेदनाद्वारे लेखी स्वरूपात महसूल आयुक्त औरंगाबाद यांच्या कडे तक्रार करण्यात आली. व तसेच मुख्य निवडणूक आयुक्त मुंबई, जिल्हाधिकारी नांदेड, उपविभागीय अधिकारी बिलोली यांना पण माहितिस्तव प्रतीलीपी पाठवन्यात आली. त्या निवेदनावर बळीराम पाटील कुंकणोर, भिमराव लाखे, मारोती गायकवाड, धोंडीबा पतंगे, अहेमद हुसेन शेख, सुरेश साखरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Www.massmaharashtra.com