पो.नि.अतुल भोसले यांच्या हस्ते पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण
[ बिलोली प्रतिनिधी – सुनिल जेठे ]
शहरातील परिवर्तन जयंती उत्सव समिती देशमुख नगर बिलोली १४ एप्रिल २०२५ रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त अभिवादन सोहळ्याचे आयोजन समितीच्या वतीने केले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, कॅण्डल प्रज्वलन नगराध्यक्षा सौ.मैथिली संतोष कुलकर्णी यांच्या हस्ते व पो.नि.अतुल भोसले यांनी आपल्या हस्ते पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण केले.
युगपूरुष, बोधिसत्व, भारतरत्न,भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी शहरातील तहसीलदार गजानन शिंदे, पो.नि.अतुल भोसले, प्रतिष्ठीत महिला नगराध्यक्षा सौ मैथिली संतोष कुलकर्णी यांची प्रमुख मान्यवर म्हणून देशमुख नगर येथील सोहळ्यात उपस्थित झाले होते.
या समितीच्या अध्यक्ष पदाधिकारी यांच्या वतीने आलेल्या मान्यवरांचे पुष्पहारने स्वागत सत्कार करण्यात आला. तद्नंतर उपस्थित शालेय बालक, मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले.
यावेळी तहसीलदार गजानन शिंदे,नगराध्यक्षा मैथीली कुलकर्णी, पो.नि.अतुल भोसले, पो.उपनिरीक्षक शिवराज लोखंडे, माजी नगरसेवक उत्तमराव जेठे, आहेत चाऊस सेवावृत्त शिक्षक गजभारे, पि.डी गायकवाड, सोपान गारे, सोनकांबळे, बालाजी लोहाळे, शिवानंद बुध्देवाड, शिवाजी गायकवाड, यांच्यासह समितीच्या पदाधिकारी, सदस्य, बौद्ध उपासक बांधव, महिला मंडळ उपस्थित होत्या.
सदर या जयंतीच्या सोहळ्याचे सुत्रसंचलन जबाबदारी वारघडे यांच्याकडे होती. सायंकाळी ४ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची मिरवणूकीत डिजेच्या गाण्यावर नाचत-गाजत कलेचे प्रदर्शन करून आनंद साजर केला.
ह्या आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणूकीसाठी पोलीस प्रशासनाकडून पो.नि.भोसले यांच्यासह पोलिस कर्मचारी,होमगार्ड कडक असा बंदोबस्त केला होता म्हणून मिरवणूकीचा शांततेच्या वातावरणात ठिक १०:३० वाजता समारोप झाला.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy