विकसित भारत संकल्प यात्रेला कुंडलवाडी उत्स्फूर्त प्रतिसाद

 [ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
         केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेची माहिती देणारे ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही दिनांक 4 रोजी सकाळी 10 वाजता शहरातील डॉ हेडगेवार चौक येथे आली असता,शहरातील नागरिक व शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन विविध योजनेची माहिती व लाभ घेतला आहे.

          कुंडलवाडी नगर परिषदेच्या वतीने शासनाच्या विविध योजनेची माहिती देणाऱ्या विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले. सदरील यात्रेमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या पंतप्रधान स्वनिधी योजना, पंतप्रधान आवास योजना,स्वच्छ भारत मिशन, आयुष्यमान कार्ड शिबिर, उज्वला गॅस योजना, आरोग्य तपासणी शिबिर,आधार अपडेट योजना,पंतप्रधान मुद्रा लोन, आदी योजनेची माहिती नागरिकांना देऊन प्रत्येक्ष लाभ देण्यात आला आहे तर प्रशासनाच्या वतीने उपस्थित नागरिकांना पंचप्रणतेची शपथ देण्यात आली असून वरील योजनेचे लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

        यावेळी मुख्याधिकारी आर जी चव्हाण, आकाशवाणी केंद्र नांदेडचे कार्यक्रमाधिकारी विश्वास वाघमारे, वैद्यकीय अधिकारी सोमेश मोरे,पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले, उपनिरीक्षक नारायण शिंदे, डॉनरेश बोधनकर,भाजपा शहराध्यक्ष हानमल्लू इरलावार, मोहम्मद अफजल,हर्ष कुंडलवाडीकर,कार्यालयीन अधीक्षक सुभाष निरावार,बालाजी टोपाजी,हेमचंद्र वाघमारे,शंकर जायेवार,प्रकाश भोरे,मारोती करपे,मोहन कंपाळे,जनार्दन भोरे, धोंडीबा वाघमारे, शुभम ढिल्लोड, सय्यद माजिद, शांताबाई शिंदे, इम्रान ईनामदार,ओमकार शाहाणे,प्राथमिक रूग्णालय कर्मचारी अंगद मुंडे, गादेवार मॅडम, आरोग्य सेविका देवकांबळे व्ही.जी, नितीन बानुकुडे, एस.एम.डोकळे,नागरी रूग्णालय कर्मचारी उषा जंजाळ,अंकुश राभवड,भालेराव शशिकांत आदीसह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या