म.ज.वि.प. च्या वतीने धर्माबाद तालुका विकास कामाची मागणी !

(धर्माबाद प्रतिनिधी – नारायण सोनटक्के)

येथील मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने तालुक्याच्या विकासासाठी मागण्यांचे निवेदन उपविभागीय जिल्हाधिकारी,तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची मुदत वाढविणे, तालुक्यातील पुनर्वसन व इतर गावातील समशान भूमी चे प्रश्न सोडविणे’ पिक विमा सरसकट मंजूर करून वाटप करणे, चालू बाकी कर्ज दारांची शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे,सौर ऊर्जा योजना बाभळी बंधारा बॅक वाटर वरील शेतकऱ्यांना व तालुक्यातील शेतकऱ्यांना मंजूर करणे, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे अनुदान हे 100% निधी शासनाकडून प्राप्त होऊनही निधी फक्त 50% वाटप होते ते शंभर टक्के वाटप करावे,तेलंगणातील शेतकऱ्या सारखे लाईट बिल शंभर टक्के माफ करणे व वीज कनेक्शन कोटेशन शेतकऱ्यास त्वरित देणे,आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले.

म.ज.वि.प. चे जिल्हा उपाध्यक्ष नागोराव पाटील जाधव रोशन गावकर,तालुका अध्यक्ष गणेश राव पाटील करखेली कर,सचिव जी.पी.मिसाळे,सदस्य माधव हनमंते यांनी नायब तहसीलदार शंकरराव हांदेश्वर यांना निवेदन दिले.

ताज्या बातम्या