कुंडलवाडीतील विविध विकास कामांसाठी खा.चिखलीकरांना निवेदन !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
शहरातील मुस्लीम समाजातील प्रलंबित शादीखाना व ईदगाह विकास बरोबर जि.प.ऊर्दू शाळेत 9 वी व 10 वर्ग वाढविण्यात यावे तसेच रिक्त शिक्षकांची जागा भरण्यात यावे आणि शतरंजीगल्लीतील आशुरखाना समोरील खुल्या जागेवर विधंन विहीर मारण्यात यावे आदी विकास करण्यात यावे यासाठी मुस्लिम समाजातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोहम्मद अफजल,शेख वाहाब,शेख जावेद,पठाण रियाज,अब्दुल माजीद नांदेडकर आदींचा वतीने खा.प्रतापराव चिखलीकर यांना निवेदन देण्यात आले.
खा.चिखलीकर यांनी शहर विकासासाठी दिलेल्या 3 कोटी 11 लक्ष अंतर्गत झालेल्या व होणा-या विविध कामाचे लोकार्पण व भुमीपुजन कार्यक्रमा अंतर्गत प्रभाग 5 मोहम्मद अफजल यांच्या घरा समोरील विधंन विहीर लोकार्पण कार्यक्रमा निमित घेण्यात आलेल्या कार्यक्रमात शतरंजी गल्लीतील मुस्लिम समाजबांधवातर्फे जिल्हाचे विकासाभिमूख खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना एक निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदन असे नमुद करण्यात आले की,शहरातील मुस्लीम ईदगाह गेल्या 90 वर्षापासून विकासापासून वंचित असुन या ठिकाणी सुविधेचा आभावाने समाज बांधवांना अनेक अडचणीस सामोरे जावे लागते.यामुळे या ठिकाणी दक्षिण व उत्तर दिशेला सुरक्षाभिंत बांधकाम, अंतर्गत रस्ते, हायमॅक्स, विधंन विहीर, वजुखाना, स्वच्छालय, प्रार्थना स्थळी टिनशेड, वृक्षारोपण करून सुशोभित करण्यात यावे.
तसेच गेल्या कित्येक वर्षांपासून असलेलेली मागणी शादीखाना अभावी शहरातील बांधवाना बोधन,बिलोली,धर्माबाद येथे अनेक अडचणीचा सामना करीत आपल्या मुलांचे तेथील शादीखान्यात लग्न करावे लागत आहे.तरी शहरात मुस्लीम बांधवासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या शादीखाना बांधकाम करून गैरसोय दुर करण्यात यावे.तसेच जिल्हा परिषद हायस्कूल येथील ऊर्दू माध्यम शाळेत सद्या आठवीपर्यंत वर्ग चार शिक्षक वर चालतात रिक्त शिक्षकांची पदे भरण्यात यावे, ऊर्दू 9 वी व 10 वर्ग वाढविण्यात मान्याता मिळवून देण्यात यावे आणि प्रभाग एक येथील नागरीकांना विधंन विहीर आभावी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.शतरंजीगल्लीतील आशुरखाना समोरील खुल्या जागेवर विधंन विहीर मारण्यात यावे आदी मागण्याचे निवेदन मुस्लिम समाजातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोहम्मद अफजल, शेख वाहाब, शेख जावेद, पठाण रियाज, अब्दुल माजीद नांदेडकर आदींचा वतीने मा.आ.सुभाष साबणे,मा.जि.प.सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, मा.नगर परिषद उपाध्यक्ष डाॅ.विठ्ठल कुडमूलवार यांचा उपस्थितीत खा.प्रतापराव चिखलीकर यांना देण्यात आले.
यावेळी खा.प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावतीने नक्कीच सर्व प्रशन सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले.यावेळी प्रभागातील हजारोचा संख्येत समाजबांधव उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या