अनेक योजना बंद करणा-या सरकारचे डोके ठीकाणावर आणण्यासाठी भाजपाला मत द्या – फडणविस !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
युती काळातील जलयुक्त शिवार योजना,मुख्यमंत्री ग्रांम सडक योजना,स्मार्ट योजना,नानाजी देशमुख कृषी योजना,शेतक-यांचे अनुदान योजना,रस्त्यासाठी तयार करण्यात आलेली योजना, पूर्ववसनाची योजना,पिक विमा योजना बंद अशा सर्व योजाना बंद करणा-या महाविकास आघा़डी सरकारचे डोके ठीकाणावर आणण्यासाठी भाजपाला मत द्या असे आवाहन उपस्थित मतदारांना विरोधी पक्ष नेते देवेद्र फडणविस यांनी केले आहे.
कुंडलवाडी येथील मुख्य बाजारपेठेत भाजपाचे अधिकृत उमेदवार सुभाष साबने यांच्या प्रचारार्थ आयोजीत करण्यात आलेल्या सभेत राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेद्र फडणविस यांनी उपस्थित मतदारांना संबोधतांना असे प्रतिपादन केले की, दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारने मिळेल तिथे खाऊ आणि सोबत राहू या प्रवृतीने हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला.मोदी सरकारने आता पर्यंत दहा लाखांच्यावर गोरगरींबाना पंतप्रधान आवास योजनेतून घरे दिली हे देतअसताना कुठल्याही व्यक्तीचे जात,धर्म पंथ,भाषा याचा विचार केला नाही उलट या सरकारने दोन वर्षात एकही घर दिले नाही.
तसेच मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होऊन शेतक-यावर असमानी,सुलतानी संकट कोसळे असता राज्य शासनाकडून एकही रूपयाची मदत मिळाली नाही,उलट राज्य शासनाने आपल्या हक्काचा हीस्सा न भरल्याने शेतक-याना पिक विमा सुध्दा मिळाला नाही.राज्यात मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण राज्य शासनामुळे मिळाले नाही म्हणुन या भ्रष्टाचारी व अनेक योदना बंद पाडणा-या सरकारला धडा शिकविण्यासाठी सुभाष साबनेला निवडूण द्या असे आवाहन मतदारांना केले. यावेळी कॉग्रेसचे भिमराव क्षीरसागर यांनी देवेद्र फडणविस यांच्या उपस्थित भाजपात पक्ष प्रवेश केला.या पक्ष प्रवेशामुळे कॉग्रेसला धक्का बसला आहे.
यावेळी केंद्रीय मंत्री भगवान खुबा,खासदार प्रताप पाटील चिखलीकर,मा.मंत्री राम शिंदे,आ.गोपीचंद पडऴकर,तुषार राठोड,राम पा.रातोळीकर,माजी आ.गोविंद केंद्रे,गंगाराम ठकरवाड,अजीत गोपछेडे,व्यंकटराव गोजेगावकर, श्रीनिवास नरवाडे, माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक विठ्ठल कुडमुलवार, नगरसेवक,पदाधिकारी आदी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या