देवव्रत विष्णू पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शॅडो कॅबिनेट सदस्य यांची जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ. सुहास माने साहेब यांच्यावर टीका !

[ अलिबाग प्रतिनिधी : अभिप्राव पाटील ]
देवव्रत विष्णू पाटील शॅडो कॅबिनेट सदस्य (मनसे) यांनी 21 /01/ 2020 ला जिल्हा रुग्णालय अलिबाग यांच्याकडे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये प्रथम अपील अर्ज दाखल केले होते. 18/02/2022 ला त्या अर्जाच प्रती उत्तर आलं. त्यावेळी देवव्रत विष्णू पाटील शॅडो कॅबिनेट सदस्य यांनी त्या अर्जाच्या प्रती उत्तरावर टीका केली.

मला या अधिकाऱ्यांची दिलगिरी काय कामाची? जिल्हा चिकिस्तक डॉ. सुहास माने साहेब काय करतात? शासकीय काम बेकायदेशीरपने असं चालतं का? की आमच्या सभ्यपणाचा तुम्ही दुसरा अर्थ लावता? आपण कायद्याने काम करणार की सत्ताधार्‍यांच्या मर्जीप्रमाणे? यांना कायद्याने काम करायचंच नाही. यांचे वरिष्ठ अधिकारी काम करत नाहीत. तरी यांच्यावर कारवाई होण्यासाठी रायगडच्या कलेक्टर साहेबांकडे तक्रार करणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देवव्रत विष्णू पाटील शॅडो कॅबिनेट सदस्य यांनी दिली.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या