कुंडलवाडीत धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
          येथील डॉ आंबेडकर नगर येथे 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पंचशील ध्वजाचे ध्वजावरण सकाळी 10:30 वाजता सहायक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सर्व समाज बांधवांनी त्रिशरण पंचशील ग्रहण केले असून भीम जयंती उत्सव समितीच्या वतीने खीरदानाचा कार्यक्रम हि ठेवण्यात आला आहे.  

          यावेळी कार्यक्रमाला सहायक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले, राष्ट्रवादी शहराध्यक्ष तथा पत्रकार अमरनाथ कांबळे,वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल इद्रिस बेग, नागोराव वाघमारे, महेंद्र वाघमारे,दादाराव यलमे,राम वाघमारे, हेमचंद्र वाघमारे,राजरतन कांबळे, राहुल कांबळे, अजय वाघमारे, साईनाथ वाघमारे,आकाश हातोडे,प्रकाश वाघमारे,हणमंत हातोडे, मारोती हातोडे, संतोष कंपाळे, संदेश वाघमारे, सुशील हातोडे, रोहित हातोडे, प्रकाश हातोडे, आदिसह मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते..
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या