श्रीलंकेत सलग तीन वेळेस खासदार असणारे पूज्य भदंत खा.रतन थेरो यांनी नांदेड़ येथे धम्मदेसना दिली !

नांदेड; दि १९
         येथील तथागत नगर येथील मूलगंध कुटी विहारात त्यांनी धम्मदेसना दिली.गेली १८ वर्षापासून ते कोलंबो (श्रीलंका) येथील खासदार आहेत.त्यांच्य समवेत आलेले श्रीलंकेतील भदंत विश्वजीत यांनी इंग्लिश मधील धम्मदेसनेचा मराठीतुन अनुवाद करत धम्मदेसना दिली.पूज्य भदंत विनय बोधीप्रिय यांच्या माध्यमातून या भदंताना प्राचारन करून धम्मदेसनेचे आयोजन करण्यात आले होते.  
श्रीलंकेतील गोरगरीब नारिकांना मदत म्हणून आपल्या वतीने भाजीपाल्याचे बि-बियाणे दान करण्यात यावे साठी ते प्रयत्न करत आहेत. आपल्या क्षमतेनुसार, इच्छेनुसार शक्य तेवढे अधिक दान करण्याचे अवाहन केले आहे.
पूज्य भदंत खा.रतन थेरो यांच्या विषयीची एक विशेष बाबा म्हणजे त्यांचे कार्य पाहता ते आगामी काळात श्रीलंकेचे ते आगामी राष्ट्रपती आहेत.दरम्यान नसोसवाय्एफ व फुले शाहू आंबेडकर युवा मंचचे सर्व पदाधिकारी यांनी त्यांच्या सोबत विस्तृत चर्चा केली तथागत नगर येथील बौद्ध उपासकांची शिस्त,वंदना करण्याची पद्धत या बाबीचे पूज्य भदंत खा.रतन थेरो यांनी विशेष कौतुक केले.यावेळी विहारात अनेक बौद्ध उपासक, उपासकांनी उपस्थिती दर्शिवली होती. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे विद्यार्थी नेते प्रा. सतीश वागरे यांनी दिली आहे.
-प्रा. सतीश वागरे – नसोसवायएफ, राज्य प्रवक्ता
9730629229

ताज्या बातम्या