लोहा येथे धनगर आरक्षण संदर्भात समाजाची आढावा बैठक संपन्न

( लोहा, प्रतिनिधि दत्ता कुरवाडे )

अनेक वर्षापासून धनगर समाजाविषयी जो अन्याय होत आहे या विषयावर व आरक्षणाच्या विषयावर लोहा तालुक्यातील तमाम धनगर युवा मंडळी यांनी आज लोहा येथे आढावा बैठक घेतली या आढावा बैठकीत धनगर समाजावर होत असलेल्या अन्यायावर व आत्तापर्यंत असलेल्या राज्य शासनाने धनगर समाजाचा कशाप्रकारे उपयोग केला व आरक्षण देऊ असे ते अनेक सरकारने वचन दिले मात्र आत्तापर्यंत कोणत्या सरकारने धनगर समाजाकडे लक्ष दिलेले दिसून आले नाही समाजाला कसे आरक्षण मिळवायचे यासंदर्भात व विविध विषयावर चर्चा करण्यात आली येत्या मंगळवारी दिनांक 29,09,2020 वेळ सकाळी 10 वाजता बिरोबा मंदिरापासून मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार आहे पूर्ण लोहा तालुक्यातील धनगर समाज सोशल डिस्टंसिंग व सॅनिटायझर चा वापर करून

लोहा तहसील कार्यालयावर ढोल बजाव आंदोलन करणार अशी माहिती या बैठकीत सकल धनगर समाजाच्या वतीने सांगण्यात आले

ताज्या बातम्या