धर्माबाद प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी श्री.रामोड यांचा सत्कार !

[ प्रतिनिधी – गौतम वाघमारे ]
पंचायत समिती धर्माबाद येथे नव्याने रुजू झालेले गट विकास अधिकारी श्री.रामोड जारीकोटकर यांचा प्रहार दिव्यांग संघटना धर्माबाद यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
 तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या अनेक अडचणी मांडल्या व त्या संबंधीचे निवेदन पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले. यावेळी माधव पांचाळ – तालुका अध्यक्ष, शिवराज बंगरवार – शहर अध्यक्ष,  साईनाथ पाटील जुन्नीकर – माजी तालुका अध्यक्ष धर्माबाद व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. रामोड यांनी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या