धर्माबाद येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या वतीने महिला कार्यकारिणी ची निवड

(विशेष प्रतिनिधी-चंद्रभीम हौजेकर)
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या वतीने महिला कार्यकारिणी ची निवड काल दि. 27/06/2021 रोजी शासकीय विश्रामगृह धर्माबाद येथे पार पडली .

या कार्यक्रमाला संघटनेचे प्रदेश सरचिटणीस राजु पाटील शिंपाळकर, जिल्हाध्यक्ष शंकरराव मावलगे, जिल्हाध्यक्षा आशाताई पांचाळ,ऊपाध्यक्षा प्रतिभाताई बोधने, नायगाव तालुकाध्यक्ष सुरजभाऊ बेळगे, नायगाव सरचिटणीस बोदने सर हे संघटनेचे पदाधिकारी ऊपस्थित होते.यांच्या ऊपस्थितीत धर्माबाद तालुक्याची महिला कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली.
धर्माबाद तालुकाध्यक्षा पदी गंगासागर ताई शंकरराव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली, व त्यांच्या सहकारी भगिनींना तालुका कार्यकारिणी तील पदे देण्यात आली.तसेच कोपुरवाड मँडम यांना बिलोली तालुका ऊपाध्यक्षा पदी नियुक्ती करण्यात आली
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजु पाटील शिंपाळकर होते, संघटनेची कार्यपद्धती जिल्हाध्यक्ष शंकरराव मावलगे यांनी विषद केली. तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार सतिष पाटील शिंदे यांनी ऊपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले व कुठलेहि काम अडले असल्यास संपूर्ण ताकदिनिशी तालुका कार्यकारिणी सोबत राहुन कामे करुन देईल असे सांगितले.
ऊपस्थित सर्व पाहुण्यांनी या कार्यक्रमाचे आयोजक छोटु पाटील बाभळीकर यांच्या कोरोना काळातील योगदानाबद्दल माहिती देऊन छोटु पाटलांची प्रसंशा केली. सतिष पाटील शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे कोरोणा योद्धा पुरस्कार छोटु पाटलांना मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असे सांगितले.
संतोष ठाकरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी छोटु पाटलांनी घेतलेल्या परीश्रमाबद्दल सर्वांना अवगत केले व दोन्ही लॉकडाऊनमध्ये छोटु पाटलांनी निस्वार्थीपणे केलेले कार्य सांगितले.
जिल्हाध्यक्ष शंकरराव मावलगे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कोरोना काळात ऊत्क्रुष्ट कार्य केल्याबद्दल शासकीय रुग्णालयातील मिना पेद्देताईंचा सत्कार करण्यात आला.
विशेष ऊपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार व मार्गदर्शक सतिष पाटील शिंदे, सुनिल पाटील कदम, रवी पाटील कपाटे, संगमनाथ रोन्टेवाड यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात समीतीचे प्रदेश सरचिटणीस राजु पाटील शिंपाळकर यांनी समितीच्या आतापर्यंत च्या कामाचा आलेख मांडला व कुठल्याही अडचणीत आम्ही सहकार्य करु अशी ग्वाही दिली, व कमी काळात यशस्वी कार्यक्रम केल्याबद्दल आयोजक युवा जिल्हाध्यक्ष छोटु पाटील बाभळीकर यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक व आभार प्रदर्शन युवा जिल्हाध्यक्ष छोटु पाटील बाभळीकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले व येणाऱ्या 4 जुलै रोजी आयोजित केलेल्या जिल्हा मेळाव्याला सर्वांनी ऊपस्थित राहावे असे आवाहन केले.
कमी कालावधीत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटील खंडापुरकर बाबा,तसेच प्रदेश ऊपाध्यक्ष अमरजितसिंग कालराजी यांनी मोबाईलकॉल द्वारे छोटु पाटलांचे कौतुक केले व नवीन कार्यकारिणी ला शुभेच्छा दिल्यात !
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या