राज्य महामार्गावरिल रस्ते व नाली बांधकाम दर्जेदार होणार – कार्यकारी अभियंता प्रविण कोरे !

डिव्हायडर करण्याची भा.ज.प. ची मागणी

(धर्माबाद प्रतिनिधी-नारायण सोनटक्के)

शहरातील बन्नाळी चौकापासून ते फुलेनगर, रेल्वे गेट क्रमांक दोन, शंकरगंज ते महाराष्ट्र बस्थानक मार्ग जाणाऱ्या राज्य माहामार्गाचे काम युध्दपातळीवर सुरू असून सदरील रस्ते व नाली बांधकाम अंदाजपत्रकानुसार  करण्यात यावे व शहरातून जाणाऱ्या रस्त्यावर डिवायडर टाकून काम करण्याची लेखी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रविण कोरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी कार्यकारी अभियंता प्रविण कोरे यांनी सदरील कामे दर्जेदार व अंदाजपत्रकानुसारच करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

  धर्माबाद तालुक्यातील येताळा,करखेली ते उमरी मार्ग नांदेडला जाणाऱ्या राज्य माहामार्गाचे रूंदीकरण,रस्ते व रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाली बांधकामांचे काम युध्दपातळीवर सुरू असून सदरील काम आता धर्माबाद शहरातील बन्नाळी चौकापासून ते फुलेनगर,रेल्वे गेट क्रमांक दोन,शंकरगंज ते महाराष्ट्र बस्थानक मार्ग कंदकुर्तीकर पर्यत सुरू आहे.

परंतु सदरील रस्ता शहरातील बन्नाळी चौकापासून, फुलेनगर, गेट क्रमांक दोन ते शंकरगंज, महाराष्ट्र बस्थानक ते सिरजखोड चौकापर्यंतच्या रस्त्यावर दुभाजक टाकून काम करण्याची मागणी करीत शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी सदरील सुरू असलेला काम बंद पडले होते.

त्यामुळे सदरील प्ररकरणाची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रविण कोरे यांनी घेतली.व त्यांनी धर्माबाद शहरातून जाणाऱ्या कामांची पाहणी करण्यासाठी सोमवारी धर्माबाद येथील शासकीय विश्रामगृहावर आले होते.यावेळी धर्माबाद तालुक्यातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था संदर्भात अनेकांनी त्यांच्यासमोर पाढा वाचला आहे. उपस्थित सर्वाची मागणी जाणून घेतले.व सध्या सुरू असलेले रस्ते,नाली व इतर कामे दर्जेदार होणार असून नागरिकांच्या मागणीचा पाठपुरावा शासनाकडे करूनच नागरीकांनी सुचविलेल्या प्रमाणेच सदरील कामे कसे करता येईल.

यासाठी प्रयत्न करणार असल्याचे साागितले आहे.तसेच सध्या सुरू असलेल्या सर्व कामांची पाहणी केली आहे.

सदरील रस्ते १२ मीटरचे रूंद असून दोन्ही बाजूने नाली बांधकाम होणार आहे.तसेच जनतेला रस्त्यावरून ये-जा करण्यासाठी फूटपाथ व विजेचे पोल बसविण्यासाठी जागाही उपलब्ध असल्याचे यावेळी कोरे यांनी सांगितले आहे.

यावेळी विविध मागण्यांचे निवेदन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र पोतगंटीवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष रामचंद्र पाटील बन्नाळीकर, नगरसेवक संजय पवार, उपनगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी, संचालक गोविंद जाधव रोशनगावकर, संचालक दत्ताहारी पाटील आवरे,काँग्रेसचे शहराध्यक्ष ताहेर पठाण यांनी दिले आहे.

यावेळी माजी नगरसेवक रविंद्र शेट्टी,भाजपा अनुसूचित जमातीचे शहर अध्यक्ष बालाजी बकवाड, सोशल मीडियाचे साईनाथ शिरपुरे, मारोती माकणे, बहुभाषिक पञकार संघाचे माजी अध्यक्ष कृष्णा तिम्मापुरे,मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष जी.पी.मिसाळे  यांच्यासह अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या