धर्मविर चित्रपटाचे निर्माता बिलोली चा भुमिपूञ मंगेश देसाई यांचा भव्य नागरी सत्कार व जीवन गौरव पुरुस्कार वाचन.

( बिलोली ता.प्र – सुनिल जेठे )
बिलोली येथे एका ब्राम्हण कुटुंबात जन्माला आलेला पुञ हा महाराष्ट्रातील जनतेच्या मनात घर केला आहे. तो कलाकार म्हणजे मंगेश देसाई. ५१ चिञपटा सह अनेक मालिकाच्या माध्यमातून प्रक्षकांच्या मनावर घर केलेल्या कलाकाराचा भव्य नागरी सत्कार व जीवन गौरव पुरुस्कार समारंभ कार्यक्रम दि.२७ मे रोजी बिलोली येथील गांधीनगर च्या मैदानावर विविध राजकीय पुढारांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

महाराष्ट्रातील नांदेड जिल्हा बिलोली तालुका येथे जन्माला आलेले श्री मंगेश देसाई यांनी २० वर्षापूर्वी बिलोली सोडली. मंगेश देसाई यांनी आपले , शिक्षण छ.संभाजीनगर येथे घेऊन, मंगेश ने मुंबईला जावून छोट्या पडद्यावर काम केले. त्यांनी अनेक चितपटात काम करत विविध हिंदी व मराठी चिञपटाचे निर्माता झाले. बिलोलीचे भुमी पूञ मंगेश हे विस वर्षानी परत आपल्या जन्म भुमीत आले.

मंगेश देसाई यांचा भव्य नागरी सत्कार व जीवन गौरव पुरुस्कार वितरण केलेले प्रमाण पञाचे वाचन या कार्यक्रमात करण्यात आले होते. मंगेश देसाई यांच्या या कार्या बद्दल बिलोली तालुक्यासह विविध क्षेत्रातील लोकांनी एकत्र येऊन कौतुक सत्कार व अभिनंदन केले.

मंगेश देसाई यांचे भव्य नागरी सत्कार व जीवन गौरव पुरुस्कार कार्यक्रम घडून आणण्यासाठी माजी आमदार गंगाधरराव पटणे व माजी नगराध्यक्ष विजयकूमार कुंचनवार यांनी प्रयत्न केले.

मंगेश देसाई यांचा सत्कार व गौरव पुरस्कार वितरन समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खा.श्रीकांत शिंदे – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिदे यांचे चिरंजीव, खा. हेमंत पाटील, माजी खा.व्यकटेश काब्दे, माजी आ. गंगाधरराव पटने, माजी आ.सुभाषराव साबणे, मुख्यमंत्री यांचे स्वीय सहायक बालाजीराव पा.खतगावकर, बिलोली न.प.माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे, मा.नगरसेवक यशवंत गादगे, विजयकूमार कुंचनवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

या सत्कार व गौरव पुरस्कार वितरन समारंभाच्या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रा.गोपाळ चौधरी यांनी केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या