शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत व पीकविमा द्या -अन्यथा कायदा हातात घेऊन आंदोलन तीव्र करू!-धर्मवीर शेतकरी संघटना

( लोहा प्रतिनिधी/ दत्ता कुरवाडे )

नांदेड दिनांक 28/9/2020
आज धर्मवीर शेतकरी संघटनेच्या वतीने लोहा तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार अन्यथा रुपये मदत देऊन, शेतकऱ्यांना तात्काळ शंभर टक्के पीक विमा लागू करा, अन्यथा कायदा हातात घेऊन आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
तालुक्यात जवळपास एक महिन्यापासून होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात असे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन मूग उडीद तूर कापूस ज्वारी केळी नासाडी होऊन सततच्या पावसामुळे नुकसान झालेलेआहे. नद्यांना पूर येऊन नदीकाठचे पिक, जमीन खरडून गेली आहे. शेतामध्ये पाणी अजूनही साचुन आहे. शेतकऱ्यांच्या हातात ,पदरात कोणतेही पीक आलेले नाही. म्हणून आज दिनांक 28 9 2020 रोजी धर्मवीर शेतकरी संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार अशोक मोकले यांना धर्मवीर शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पाटील जाधव यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष लक्ष्मण मोरे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष संग्राम पाटील डिकळे,संघटनेचे उपाध्यक्ष अंगद मडकीकर, युवा अध्यक्ष पांडुरंग तोरणे, कार्याध्यक्ष सुदर्शन शेंबाळे आदींच्या उपस्थितीत स्वाक्षरीने नायब तहसीलदार मोकले यांना निवेदन देण्यात आले.

ताज्या बातम्या