खासदार धीरज साहु यांच्या पुतळ्याला नायगाव येथे जोडे मारो आंदोलन.

[ विशेष प्रतिनिधी  – गणेश कंदुरके ]
काँग्रेसचे झारखंड राज्यातील खासदार धीरज साहू यांच्याकडे आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत 300 कोटीपेक्षा जास्त अवैध पैसा मिळालेला आहे.त्याचा निषेध करण्यासाठी नायगाव येथे धीरज साहु यांच्या पुतळ्याला जोडे मारून आंदोलन करत आहोत अशी माहिती भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा नांदेड जिल्हा अध्यक्ष पूनम पवार यांनी माहिती दिली आहे.

भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, व महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा ताई वाघ यांच्या आदेशानुसार आज सकाळी दिनांक 11/12/2023 रोजी ठीक 11 वाजता भाजप महिला मोर्चा च्या नेतृत्वाखाली हे आंदोलन महाराष्ट्रभर होणार आहे, त्याच अनुषंगाने नांदेड जिल्हा महिला मोर्चा तसेच सगळया भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
या वेळी आंदोलनकर्ते भारतीय जनता पार्टी महिला नांदेड जिल्हा अध्यक्ष पूनम पवार, भारतीय जनता पार्टी महिला जिला उपाध्यक्ष प्रतीक्षा पाटील नायगाव शहर अध्यक्ष जयश्री पाटील, मनीषा कल्याण,भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष दत्ता पाटील ढगे, अवकाश पाटील धुपेकर, गजानन चव्हाण, म्हादव कोलगाने व आदीजण होते.
यावेळी आंदोलकांनी घोषणा पुडील प्रमाणे दिल्या .कांग्रेस हटाव, गरीब बचाव, काँग्रेस गोलमाल जनतेचे हालहाल, मळलेला हात करतो जनतेचा घात, काँग्रेसचा हात पोटावर लाथ, कैश’ की कोठरी, पाप की गठरी, मोहब्बत की दुकान चोरी का सामान, अशा प्रकारच्या घोषणा आंदोलन कर्त्यांनी दिल्या आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या