बिलोली येथील दिलीप उत्तरवार यांना वाढदिवसानिमित्त मिञ परिवाराकडून गोमाता ची भेट

( बिलोली ता.प्र – सुनिल जेठे )
नांदेड हैदराबाद रस्त्या लगत असलेले जय भवानी हॉटेलचे मालक दिलीप उत्तरवार यांना वाढदिसानिमीत्ताने मिञ परिवाराकडून गोमाता भेट देण्यात आली.
 भारतीय जनता पार्टीचे माजी शहरध्यक्ष तथा जय माता दी मिञमंडळाचे अध्यक्ष दिलीप उत्तरवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक कार्यकर्ते माधवराव मेघमाळे यांनी गोमाता भेट देऊन समाजात आनोखा उपक्रम राबविला.

दिलीप उत्तरवार यांनी आपल्या वाढदिवसानिमिताने बॕनरबाजी न करता त्यांनी दर वर्षी वृक्षारोपन, शालेय साहित्य, गोमाताला चारा टाकने, गोर गरीब दुबळ्या लोकांना अन्न वस्ञ देण्याचे अनोखे उपक्रम राबवतात.
म्हणून त्यांच्या या कार्याची दखल घेत, माधवराव मेघमाळे यांनी गोमाता देण्याचा मानस समाजास दाखुन दिला. दिलीप उत्तरवार यांनी पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणे केक न कापता गोमातेची सेवा करण्याचा संकल्प करीत आपला वाढदिवस साजरा केला.
यावेळी माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे, भाजपा युवा मोर्चाचे ता.अध्यक्ष इंद्रजित तुडमे, सामाजिक कार्यकर्ता माधवराव मेघमाळे, माजी नगरसेवक खंडू खंडेराय, सतिष गौड, राजू गादगे, उदय चौव्हान, सय्यद रियाज, दिपक जाधव, गोविंद गुडमलवार यासह मिञमंडळ उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या