नायगाव तालुक्यात पुन्हा ढगफुटी झाल्याने शंभर टक्के शेताचे पिकाचे नुकसान शेतकरी चिंतेत !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तालुक्यात यावर्षी हवामानाच्या अंदाजानुसार वेळेवर पाऊस न पडल्यामुळे लेट पाऊस पडला सर्वत्र मोठ्या ढग फुटी झाल्याने शेतकऱ्याने व्याजबट्टी तर उसनlवारी पैसे घेऊन पिकाची पेरणी केली होती.

परंतु सतत ढगफुटीमुळे शेतातील नष्ट झाले असून शंभर टक्के पिकाचे नुकसान झाल्यामुळे शासनाने त्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस पडेल पिके चांगली येतील असे स्वप्न बाळगले असताना अचानक हवामान खात्याचा अंदाजानुसार एकशे तीस टक्के पाऊस मोठ्या प्रमाणात पडेल म्हंटले होते परंतु निसर्गाने अवकृपा केल्यामुळे जून महिन्यात पाऊस न पडता जुलै मध्ये मोठ्या प्रमाणात जागोजागी ढगफुटी झाली.

शेतकरी कर्जबाजारी होऊन महागा-मोलाची पीक, बियाणे, खते शेतात टाकून ही पिके निघालेच नाही. पुन्हा चार आॕगस्ट रोजी तालुक्यातील नायगाव,  नरसी, मांजरम, बरबडा  कुंटूर सर्व सर्कल मध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावून ढगफुटी झाल्यामुळे नदी नाले काटोकाठ भरून वाहू लागले.

तसेच असलेल्या पाण्यामुळे काही शेतात सोयाबीन, कापूस, कवळी कवळी रोपे आलेली असताना शेतकऱ्याचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. म्हणून शासनाने शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर करून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या