छ. शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या ग्रामसेवक मुदखेडे यांना निलंबित करावे अन्यथा उपोषण, डेबोजी क्रांती दलचा इशारा !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
  वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त मौजे अंचोली येथे ग्रामपंचायत कार्यालय मध्ये कार्यरत असलेले ग्रामसेवक रामेश्वर मुदखेड यांनी आपल्या पायात बूट घालूनच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्याने त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी डेबोजी क्रांती दलाचे मराठवाडा उपाध्यक्ष शिवाजीभाऊ कुंटूरकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
   वृत्त असे की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुळवाडी भूषण वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त काल सर्वत्र अभिवादन केले असताना, नायगाव तालुक्यातील मौजे अंचोली येथील ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेले ग्रामसेवक रामेश्वर मुदखेडे यांनी मुजोरपणाने वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पायात बूट घालूनच पुष्पहार अर्पण केले आहे.
 यावर अनेकांनी संताप जनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून अशा मस्त खोर आणि मुजोर असलेल्या व कर्तव्यनिष्ठ नसलेल्या ग्रामसेवक मुदखेडे यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी गटविकास अधिकारी नायगाव पंचायत समितीकडे डेबोजी क्रांती दलाचे मराठवाडा उपाध्यक्ष शिवाजीभाऊ कुंटूरकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा निलंबन नाही केल्यास आपण लोकशाही मार्गाने पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत असाही त्यांनी इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या