दिव्यांगांना मिळणाऱ्या तीन चाकी सायकल वाटप न झाल्याने भंगारात काढण्याची वेळ दिव्यांगां मध्ये तीव्र संताप !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
शासनाच्या गेंड्याची कातडी असलेल्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला असल्याचे चर्चा सर्वत्र होत आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होऊन संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची मागणी. 
तालुक्यातील मिनी मंत्रालय समजले जाणाऱ्या नायगाव येथील शासनाच्या समाज कल्याण अंतर्गत पंचायत समितीच्या वतीने दिव्यांगाना वाटप करण्यासाठी आलेल्या तीन चाकी सायकली लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी भ्रष्टाधिकाऱ्यामुळे तीन वर्षापासून धूळखात भांगारात पडल्यामुळे दिव्यांग लाभार्थी लाभापासून वंचित झाल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शासनाच्यावतीने दिव्यांग नागरिक व विद्यार्थ्यांना शाळेमध्ये वेळेवर जाता यावे व त्यांना मदतीचा हात मिळावा, मनोबल वाढावे म्हणून समाज कल्याण विभागाअंतर्गत पंचायत समितीकडे मिळणाऱ्या शेकडो तीन चाकी सायकली सन 2020 मध्ये दिव्यांग विद्यार्थी व लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी आलेल्या सायकली ठेवण्यासाठी पंचायती समितीकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे संबंधित अधिकाऱ्याने खाजगी शिक्षण संस्थाचालकाकडे परवानगी घेऊन दोन वर्ष ठेवल्या होत्या.
परंतु नंतरच्या काळात सायकली पंचायत समिती तहसील विभागाच्या शेजारी असलेल्या समाज कल्याण विभागाच्या सामाजिक न्याय भवन येथील निवासी शाळेत पंचायत समितीच्या वतीने ठेवण्यात आले आहेत.
परंतु सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्याने पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्याकडे दिव्यांगांना वाटप करण्यात येणाऱ्या तीन चाकी सायकल घेऊन जाव्या अशी विनंती पत्र व्यवहार गटविकास अधिकाऱ्याकडे करून ही तालुक्यावर राज्य करणाऱ्या व पंचायत समितीवर निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाल्याने या प्रकरणी जबाबदार असलेले अधिकारी यांच्या भ्रष्ट कारभारामुळे दिव्यांगासाठी येणाऱ्या तीन चाकी सायकल तीन वर्षापासून धूळ खात पडून राहिल्यामुळे त्या सायकल तुटून, गंजून जाऊन, भंगारात जाण्याची वेळ आल्यामुळे याप्रकरणी दोषी अधिकाऱ्याची उच्चस्तरी चौकशी करून संबंधितावर कडक कार्यवाही होऊन गुन्हे दाखल व्हावे अशी मागणी सर्वसामान्य व दिव्यांग बांधवाकडून होत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या