काँग्रेसकडून जिल्हा बँक निवडणुकीसाठी संदीप पा.कवळेंचा उमेदवारी अर्ज दाखल !

महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती…
————————————–

(नांदेड जिल्हा प्रतिनिधी -आनंद सुर्यवंशी)
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीसाठी उमरी तालुक्यातून सेवा सहकारी सोसायटी मतदार संघातून संदीप मारोतराव कवळे यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज निवासी उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी लतीफ पठाण यांचेकडे बुधवारी दि.३ मार्च रोजी नांदेड तहसिल कार्यालयात दाखल करते वेळेस महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी, युवानेते प्रा.रविंद्र पा.चव्हाण, तालुकाध्यक्ष प्रल्हाद पा.ईज्जतगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष पांडुरंग देशमुख गोरठेकर, कार्याध्यक्ष लिंगराम पा.कवळे,सिंधीचे सरपंच प्रभाकरराव पा.पुयड, भगवानराव मनूरकर, पांडुरंग पुदलवाड गुरुजी, बापुराव पा.करकाळेकर,मोहनराव पा.कारलेकर,मलीकार्जून चंदापुरे,आतम चव्हाण, रेखाताई पा.गोळेगावकर,माजी नगरसेवक उतम आयेवार,यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी भाजपाकडून माजी आ.बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांचे चिरंजीव कैलास देशमुख गोरठेकर हे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले असून काँग्रेसकडून उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांचे चिरंजीव संदीप पा.कवळे, विरुद्ध भाजपाकडून माजी आ.बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांचे चिरंजीव कैलास देशमुख गोरठेकर,असा दुरंगी सामना पहावयास मिळणार असून दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांनी पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.

ताज्या बातम्या