जिल्हा ग्रामसेवक युनियन च्या ञैमासिक बैठकीचे रविवारी आयोजन !

अनेक विषयांवर सखोल चर्चा होणार
[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
ग्रामसेवकांची सर्वांत अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (डीएनई १३६) शाखा नांदेड च्या ञैमासिक बैठकीचे आयोजन रविवारी कोलंबी ता.नायगाव येथे करण्यात आले आहे.संघटनेशी संलग्न असलेल्या जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिका-यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा कोषाध्यक्ष धम्मानंद धोञे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी यांच्या अडीअडचणी, हितासाठी सदैव अग्रभागी असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (डीएनई १३६) शाखा नांदेडच्या ञैमासिक बैठक रविवारी नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे सकाळी अकरा वाजता आयोजीत करण्यात आली आहे.
बैठकीमध्ये विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात येणार आहे.ज्यामध्ये संघटनेची तालुकानिहाय वर्गणी जमा करणे,गटविकास अधिकारी यांना प्रदान केलेले निलंबनाचे अधिकार कमी करणे, गटविकास अधिकारी यांना १९० दिवसाचे रजा मंजुरी चे अधिकार देणे,ग्रामसेवकांना ग्राम विकास विभागाच्या व्यतिरिक्त इतर विभागाची कामे न लावणे,कंञाटी ग्रामसेवक यांचे दहा हजार सुरक्षा ठेव रक्कम परत करणे,मागील दोन वर्षाचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरीत करणे,१५ व्या वित्त आयोगाअंतर्गत येणाऱ्या अडीअडचणीवर चर्चा करणे,ग्रामसेवकांना स्थायीत्वाचा लाभ देणे,पंचायत राज कमिटी दौऱ्याबाबत चर्चा करणे,राज्य संघटनेच्या पंढरपूर येथे झालेल्या ञैमासिक बैठकीतील विषयावर चर्चा करणे,आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी देणे यांसह आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर चर्चा होणार आहे.कोविड१९ नियमांचे पालन करुन बैठक घेण्यात आहे.सर्व तालुकाध्यक्ष,सचिव,जिल्हा कार्यकारिणी मधील पदाधिका-यांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन कोषाध्यक्ष धम्मानंद धोञे यांनी केलेले आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या