जिल्हा रूग्णालय अलिबाग येथे सिव्हील सर्जन डाॅ.माने यांची देवव्रत विष्णु पाटील यांनी घेतली भेट.

[ अलिबाग प्रतिनिधी – अभिप्राव पाटील ]
दि. १५ नोव्हेबर रोजी जिल्हा रूग्णालय अलिबाग येथे सिव्हील सर्जन डाॅ.माने साहेब यांची देवव्रत विष्णु पाटील यानी पुर्व नियोजित भेट घेतली. यावेळी २०-२५ मिनिटे उभयतात चर्चा झाली 
यावेळी देवव्रत पाटील यांनी अहमदनगर जिल्हा रूग्णालयाला लागलेल्या अगीच्या व त्यामुळे झालेल्या जिवीत हनीच्या पार्श्वभूमीवर आपल्या अलिबाग जिल्हा रूग्णालयातल्या आग प्रतीबंधक उपाय योजनांची माहीती घेतली. तसेच जुन्या इमारतीच्या दुसर्या माळ्यावर वारंवार पाण्याची समस्या असते त्यावर कायम स्वरूपी उपाय योजना करण्या विषयी सांगण्यात आले. तसेच शौचालयांच्या कडी तुटल्या असल्याचे ही माहिती दिली. त्या लवकरात लवकर बसविण्यास सांगितले. यावेळी डाॅक्टर साहेबांनी कोरोनाचे रूग्णांची संख्या जरी कमी झाली असली तरी दररोज ६००-६५० टेस्ट केल्या जात असल्याची माहिती दिली.
तसेच ऑक्सिजन पुरवठ्या व प्लॅट विषयी यावेळी माहिती घेतली. सदर बैठकीच्या वेळी डाॅ. फुटाणे ही उपस्थित होते. सदर बैठकी नंतर देवव्रत पाटील यांनी अपंग विभागाची भेट घेऊन तेथील सद्यस्थिती जाणुन घेतली.
(दोन महिन्यांपुर्वी या विभागात आग लागुन बरेच नुकसान झाले होते.)
www.massmaharashtra.com युट्युब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी फोटोवर क्लिक करा

ताज्या बातम्या