शीतल भालेकर यांना जिल्हास्तरीय आस शैक्षणिक प्रोत्साहन पुरस्कार प्रदान

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
        दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी आस शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना जिल्हा नांदेडतर्फे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय आस शैक्षणिक प्रोत्साहन पुरस्कार वितरण सोहळा देवकृपा लॉन्स छत्रपती चौक नांदेड येथे सम्पन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर साहेब हे होते. तर विशेष उपस्थिती अप्पर जिल्हाधिकारी मा. बोरगावकर साहेब, शिक्षण सहसंचालक मा. डॉ मठपती साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी मा. दिग्रसकर साहेब, शिक्षणाधिकारी (प्राथ) मा. डॉ बिरगे मॅडम यांच्या उपस्थितीत राज्यातील गुणवंत शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावळी ता बिलोली येथील सहशिक्षिका शीतल भालेकर यांच्या उत्कृष्ठ शैक्षणिक कार्याची दखल घेऊन जिल्हास्तरीय आस शैक्षणिक प्रोत्साहन पुरस्कार स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पहार देऊन यथोचित गौरव करण्यात आला. 
आजपर्यंत भालेकर यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक नवोपक्रम राबवून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य करत आले आहेत. विज्ञान प्रदर्शन, इनस्पयार्ड अवार्ड अश्या महत्वपूर्ण स्पर्धेत विद्यार्थ्यांना सहभागी करतात.
माझी शाळा जिल्हा परिषद शाळा या मोफत ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीधारक तसेच नवोदय विद्यालयात प्रवेशित केलेले आहेत. यावर्षी जिल्हाधिकारी मा. अभिजित राऊत यांच्या रस्ते की पाठशाळा या उपक्रमात शाळेतील इयत्ता सातवीच्या मानव व प्रणव या दोन विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेऊन जिल्ह्यातून उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवलेले आहेत. सदरील कार्याची दखल घेऊन आस संघटनेचे प्रांताध्यक्ष मा. युवराज पोवाडे यांनी बिलोली तालुक्यातून भालेकर मॅडमची पुरस्कारासाठी निवड केली होती.
मॅडमच्या उत्कृष्ट कार्याबद्दल दिल्या गेलेल्या आस शैक्षणिक प्रोत्साहन पुरस्काराबद्दल केंद्रप्रमुख सोनकांबळे सर, मुख्याध्यापक कोलोड सर व सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या