जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत कु शिवानी ढगे विजेती !

[ नायगाव बा. ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
 जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय तर्फे घेण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे हे सलग 35 वे वर्ष होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील नामांकित 18 शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. प्रथम क्रमांक कु.शिवानी साहेबराव ढगे जनता कनिष्ठ महाविद्यालय नायगाव या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. कु. नौशीन अब्दुल बारी शेख हिने द्वितीय क्रमांक पटकवला, तृतीय क्रमांक शिवराज प्रकाश मोरे मिलेनियम पब्लिक स्कूल नायगाव तर कु ऋतुजा दीपक पाटील संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धुपा या विद्यार्थिनीने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले.
  स्पर्धेचा विषय भारतीय संविधान -मूलभूत हक्क आणि कर्तव्य हा होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायगाव विधानसभेचे चे प्रथम आमदार व संस्थेचे अध्यक्ष वसंतरावजी पाटील चव्हाण हे तर उद्घाटक म्हणून नांदेड चे उपविभागीय अधिकारी विकास माने हे होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव रवींद्र पाटील चव्हाण, गटविकास अधिकारी नंदकुमार काकडे,संस्थेचे संचालक माधवराव बेळगे, सौ. सुंदरताई चव्हाण, कोषध्यक्ष गोविंदराव मेथे, प्राचार्य के. जी. सूर्यवंशी,माजी प्राचार्य ह. स. खंडगावकर, श. ल. अंजनिकर, प्राचार्य मारुती माने, चंद्रकांत कदम, वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक प्रा. सौ. कल्पना जाधव, प्रा. सौ. श्रुतीताई चव्हाण, प्रा.डॉ.सौ. शिल्पाताई चव्हाण, उपप्राचार्य डॉ. गणेश देवडे, उपमुख्याध्यापक यशवंत चव्हाण, पर्यवेक्षक सौ. शोभा शिंदे,हणमंत शिंदे, एम. डी. चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य के. जी. सूर्यवंशी यांनी वर्षभरा तील शालेय उपक्रमाचा आढावा उपस्तिथासमोर मांडला. कार्यक्रमाचे उदघाटक श्री विकास माने यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना गरीब शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा प्रशासकीय सेवेत अधिकारी केवळ जिद्दी च्या जोरावर होऊ शकतो हे स्व:अनूभवातून सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना संस्थेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगून आपले जीवनातील ध्येय निश्चित करून त्यासाठी कठोर मेहनत करावी असे आवाहन केले.याप्रसंगी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचलन वसंत माने यांनी तर आभार पर्यंवेक्षक डॉ. गणेश देवडे यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजक प्रा. पी. डी. जाधव बारूळकर , प्रा. डॉ. राजेंद्र इंगळे, वसंत माने हे होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. बाबासाहेब शिंदे,प्रा. म. हा. सोमावार,प्रा. माधव बावालगावे, प्रा. गजानन शिंपाळे, प्रा. पप्पू जाधव,प्रा. तिरुपती मेथे, प्रा. नागप्पा दुड्डे, प्रा. माधव जाधव, प्रा. ज्ञानेश्वर बैस,प्रा.शिंदे आर. आर.,सय्यद अयुब, संगमेशवर शिंदे, श्रीपती ढगे,शरद जोनकले, बी. आर. शेख, सय्यद वासिम, संजय मल्लमवार, स्वरागंगा संगीत संच चे गणेश हाक्के, आनंद गायकवाड यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या