जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत आंतरभारती व साने गुरुजी विद्यालयाचे यश !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
 बिलोली येथील आंतरभारती शिक्षण संस्थेअंतर्गत असलेल्या आंतरभारती माध्यमिक विद्यालय व पूज्य साने गुरुजी प्राथमिक विद्यालय या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आंतरशालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत नेत्र दीपक यश संपादन केले आहे. यास्पर्धेत जिल्हातील अनेक शाळा सहभागी झाले होते.

त्याच अनुषंगाने वैयक्तिक खेळात आंतरभारती माध्यमिक विद्यालयातील वयोगट 14 उंच उडी मध्ये मिथाली पिटलेवाड प्रथम,वयोगट 17 लांब उडी मध्ये बद्वेवाड गायत्री द्वितीय क्रमांक पटकावला आहे तर पूज्य साने गुरुजी प्राथमिक विद्यालयातील श्रद्धा बद्वेवाड वयोगट 14 उंच उडी मध्ये द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
या विध्यार्थ्यांना मार्गदर्शन विजयकुमार गायकवाड,सायरेड्डी ठक्कुरवाड, बालाजी पोरडवार यांनी केले आहे. सदरील विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड झाल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष गंगाधरराव पटने,उपाध्यक्ष नंदाताई पटने, सचिव चंद्रशेखर पाटील सावळीकर, सहसचिव तथा मुख्याध्यपिका जयमाला पटने, मुख्याध्यापक विठ्ठल चंदनकर,सहशिक्षक शैलजा देशपांडे,माधव मोरे, लालू परसुरे, पद्मावती शिळेकर, अमरनाथ कांबळे,राम बादेवाड, सुधा दगडे, देवेंद्र पाटील, फरा शेख आदीसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या