लोकशाही मराठी पञकार संघाच्या नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी चंद्रभीम हौजेकर यांची नियुक्ती !

धर्माबाद प्रतिनिधी: औरंगाबाद येथिल सुभेदारी शासकिय विश्रामगृहात लोकशाही मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोंबले यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा विभागिय बैठक संपन्न झाली.पत्रकार चंद्रभीम हौजेकर यांनी अनेक वषाॅपासून वृतपत्र आणी टि वी चॅनेल च्या माध्यमातून जनतेच्या समस्येला वाचा फोडून सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय, शैक्षणिक,क्षेत्रातील घडामोडीवर आधारित वृतपत्राच्या माध्यमातून केलेल्या कामाची दखल घेऊन लोकशाही मराठी पञकार संघाच्या नांदेड जिल्हा अध्यक्ष पदाचे चंद्रभीम हौजेकर यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील कायाॅसाठी त्यांना शुभेछा देण्यात आल्या. यावेळी लोकशाही मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र.संस्थापक-अध्यक्ष सचिन बोंबले,उपाध्यक्ष अमोल पाटील,सचिव तथा पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संग्राम पाटील,मराठवाडा विभाग प्रभारी दत्तात्रय मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठवाडा विभागीय अध्यक्ष दशरथ सुरडकर यांच्या आदेशानुसार हि निवड करण्यात आली असून चंद्रभीम हौजेकर यांच्या नियुक्तीबद्दल विविध क्षेत्रामधून त्यांचं अभिनंदन होत आहे.त्यामध्ये शासकीय,राजकीय,सामाजिक व मित्र मंडळा कडून सुद्धा अभिनंदन होत आहे.

“मी लोकशाही मराठी पत्रकार संघ,संस्थापक-अध्यक्ष सचिन बोंबले सर,उपाध्यक्ष अमोल पाटील सर,सचिव तथा पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संग्राम पाटील सर,मराठवाडा विभाग प्रभारी दत्तात्रय मोरे सर,मराठवाडा विभागीय अध्यक्ष दशरथ सुरडकर सर विजय खरात यांना माझ्या नियुक्तीचे श्रेय देऊन माझ्या वर टाकलेल्या जवाबदारी ला योग्य प्रकारे न्याय देऊन पञकारिता क्षेञातील दुर्लक्षित,अन्यायग्रस्त आणि मुख्य प्रवाहा पासून दूर इतर संघटनेत नामधारी किंवा निम्न पदावर खितपत पडलेल्या पञकारिता क्षेञातील पञकार बांधवांना आपल्या संघामध्ये सहभागी करून देण्याबरोबरच त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अथक परिश्रम करत राहिल.अशी प्रतिक्रिया नांदेड जिल्हा अध्यक्ष चंद्रभीम हौजेकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.”

www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या