डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमीत्त जिल्हास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा !

● आयोजक – इंद्रजीत डुमणे गागलेगावकर ●
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त भव्य आँनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे अशी माहीती आयोजक इंद्रजीत डुमणे गागलेगावकर यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.
पुढे बोलतांना डुमणे म्हणाले की, दिवसेंदिवस नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे प्रमान वाढत असल्यामुळे ऑफलाईन पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन न करता आँनलाईन वक्तत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

● स्पर्धेचा विषय:-

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जिवन चरिञ!

● स्पर्धेचे नियम:-

(1) स्पर्धक इयत्ता सातवी ते बारावी इयत्तेत शिकत असलेला असावा. (2) दि.1 एप्रिल ते 12 एप्रिल पर्यंत 7387625599 या वाट्सप नंबर वर पाठवावा. (3) व्हीडीओ फक्त 5 मिनीटाचाच असावा. (4) व्हीडीओ एडीटिंग केलेला नसावा. (5) व्हीडीओ स्पष्ट आवाजामध्ये असावा.
या स्पर्धेमध्ये प्रथम विजेत्या स्पर्धकास 2100 रुपऐ रोख रक्कम व प्रमाण पञ तसेच द्वितीय पारितोषक 1500 रुपये व प्रमाणपञ तर तृतीय पारितोषक 1000 रुपये व प्रमाणपञ व दोन स्पर्धक उत्तेजनार्थ काढण्यात येणार आहे. प्रत्येेेक स्पर्धकास प्रमाणपञ देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण अरुणकुमार सुर्यवंशी कोळगावकर यांच्या उपस्थितीमध्ये विजेत्यांची निवड झाल्यानंतर करण्यात येणार आहे.
तसेच या कार्यक्रमाचे संयोजक गौतम वाघमारे कांगठीकर, भगवान सोंडारे थडी बोरगावकर, गंगाधर भेदेकर चिटमोगरेकर, गंगाधर भंडारे थडी सावळीकर,सुमित धोञे नागणीकर हे आहेत.
तरी नांदेड जिल्हातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा हि विनंती संयोजक व आयोजकांकडुन करण्यात आले आहे. 

   ( सामाजिक कार्यकर्ते – इंद्रजित डुमणे गागलेगावकर )

ताज्या बातम्या