रुई खुर्द श्मशान भुमीत अंत्यसंस्कार करण्या करीता तारे वरची कसरत.

[ कुंटुर प्रतिनिधी – बालाजी हनमंते ]
नायगाव तालुक्यातील कुंटूर परीसरातील रूई( खुर्द) येथे कोणाचे निधन झाल्यास अंत्यसंस्कार करण्यासाठी  रस्ता नसल्याने तारे वरची कसरत करावी लागत आहे. जनतेच्या समस्या सोडवण्याचा दावा सगळेच पुढारी करतात पण खरंच त्या समस्या सुटतात का? हा सवाल गावकरी विचारात आहेत.
आम्ही सर्व हिंदुत्वाला मानणारे लोक आहोत. आपल्या परीसरात देखील बहुसंख्य हिंदू व बहुजन समाज आहेत. हिंदू धर्मात चालत आलेल्या रूढी आणि परंपरानुसार मयत व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जातात. पण  रुई (खुर्द) गावात मृत्यू झाल्यानंतरही यातना सहन कराव्या लागत आहेत.
दि ३१ /१०/२०२२ रोजी सोमवारी अल्पशा आजाराने कै. किशनराव पाटील नरगले यांचे निधन झाले. एक महिना पुर्वी गावात मोठा पाऊस झाला होता. त्यामुळे चिखलमय रस्ता आहे. अंत्ययात्रे ला चिखल मय रस्त्यातून वाट शोधत जावे लागले.
गावाला स्मशानभूमी असल्याने या गावातील पारंपारिक वाहिवाटे प्रमाने वाटेने जाताना अनेक समस्येला तोंड द्यावे लागत आहे आणि तारेवरची कसरत करावी लागत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या